पुणेः विश्रांतवाडी :डोक्यात सिलेंडर घालून पतीने केली पत्नीची हत्या
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका निर्दयी पतीने डोक्यात सिलिंडर घालून तिची अत्यंत निघृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. माधुरी मनोहर मोरे (वय ४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.