*गृहरक्षक दल जिल्हा चंद्रपूर यांनी केला 78 वा वर्धापन दिन सप्ताह साजरा*.
चंद्रपूर ::– 06 डिसेंबर 1946 या दिवशी होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली असून या दिनाचा औचित्य साधून प्रत्येक वर्षी होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड चंद्रपूरच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी क्राईस्ट हॉस्पिटल महेश नगर तुकूम व जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड तुकूम चंद्रपूर येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी माननीय रीना यादवरावजी जनबंधू जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा होमगार्ड कार्यालय चंद्रपूरच्या प्रशासिक अधिकारी मा. नंदा सूर्यवंशी, केंद्रनायक मा. श्री नरेश राहुड व उजळणी प्रशिषण शिबीर क्रमांक 11/12 दिनांक 09.12.2024 ते 16.12.2024 चे कर्तव्य अधिकारी
श्री विजय कुकडकार , श्री संजय कातकर , मानसेवी निदेशक श्री सिद्धार्थ रामटेके , श्री धनपालसिंग वधावन यांच्या नेतृत्वात क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूरचे व्यवस्थापक – फादर बिपिन तेवकेकरा, सहव्यवस्थापक- फादर डेनी चिठ्ठीलापल्ली, सहसंचालक- डॉक्टर मेजो जोसेफ, सिस्टर चैतन्य, प्रकल्प समन्वयक – जोसेफ दोमाला, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाला जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथील होमगार्ड उजळणी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित आलेले संपूर्ण तालुक्यातील शिबिरार्थी यांनी अथक परिश्रम घेतले..