वंदे भारत लाईव टीव्ही न्यूज राजुरा
राजुरा : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील बालकाच अपहरण करून रेल्वे गाडी ने जात असताना. बालकाने समयसूचक साधून बल्हारशाह रेल्वे स्टेशन येथे उतरल्याने अपहरणकर्त्याचे योजना फसली. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील चंद्रकुमार दुबे यांचा मुलगा श्रेयांश हा सायकलवरून शिकवणीसाठी जात असताना अज्ञात व्यक्तीने तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण केले. हा मुलगा रेल्वे स्थानकाच्या शेवटच्या टोकाला बसलेला आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, काल १६ जानेवारी ला हेडकॉन्स्टेबल पी. एस. मदने यांनी सहाय्यक उपनिरीक्षक रामनिवास यादव यांना फोन करून सांगितले की श्रेयांश दुबे नावाच्या एका मुलाचे त्याच्या शिकवणीतून कोणीतरी अपहरण केले असल्याची माहिती दिली. सहाय्यक उपनिरीक्षक रामनिवास यादव व चाइल्डलाइन कर्मचारी सायंकाळी ७.२५ च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर शोध घेत असताना त्यांना दिसले की, प्लॅटफॉर्मवर असलेल्या तिवारी स्टॉलजवळ सुमारे १३ वर्षे वयाचा आणि किंचित अस्वस्थ अवस्थेत असलेला एक मुलगा बसला आहे. त्याच्याकडे जाऊन सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली असता, त्याला चाइल्ड लाईनमध्ये आणून विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव श्रेयांश दुबे (१३) सांगितले आणि तो शिकवणीला जात असताना दुपारी साडेतीन वाजता पल्सर दुचाकी वरून कोणीतरी माझ्याजवळ आले आणि तोंडावर रुमाल ठेवले. यामुळे मी पाहू शकलो पण समजू शकलो नाही आणि तो जे काही म्हणाला ते करत राहिलो आणि त्यानंतर त्याला कशाचीही कल्पना नाही. तसेच आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार पाठक यांना माहिती दिली. बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्ये गोंदियाकडून येणारी ट्रेन आणि प्लॅटफॉर्म शोधण्यासाठी कळवण्यात आले. जेव्हा ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आली तेव्हा श्रेयांशला जाग आली आणि त्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि बसला होता तेव्हा आरपीएफ ने श्रेयांशच्या शारीरिक आरोग्याची तपासणी केल्यानंतर त्याने दिलेल्या मोबाईलवर त्याच्या कुटुंबाला माहिती दिली. त्याच्या वडीलाला मुलगा सुपूर्द करण्यात आले.