
संजय क. पारधी चंद्रपुर
चंद्रपुर : योगनृत्य परिवार मुख्यालय चंद्रपुर चे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद ऊच्च प्राथमिक शाळा वरवट येथे ऐक दिवसीय भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले जिल्हा प्रमुख सुरेश घोडके महिला जिल्हा प्रमुख किशोरीताई हिरूळकर जिल्हा शिबीर प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख अशोक पडगीलवार मुख्याध्यापिका ज्योती चौधरी ईत्यादीनी शिबीराचे आयोजन केले होते. बालमनावर योगाचे संस्कार घडावे व्यायामाची गोडी निर्माण व्हावी. पि टी ऐवजी योगनृत्यामुळे सर्व शरिराचा व्यायाम होतो मन शांत राहते झोप चांगली येते अभ्यास करन्याची गोडी निर्माण होते शरीर तंदुरुस्त राहते. या कारणामुळे योगनृत्य परिवार चंद्रपुरातील शाळेत विध्यार्थ्यांना योगनृत्याचे धडे देत आहेत. दुर्गापूर केंद्र प्रमुख जितेंद्र सरबेरे शक्तीनगरचे केंद्र प्रमुख विजय घोनमोडे .संघटन प्रभारी विठ्ठल देशमुख सदाशिव नगराळे. मनिषा गोपीशेटटी माधुरी शेंडे ईत्यादीनी योगनृत्याचे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना दिलें संगीताच्या तालावर मुलांनी आंनद घेत डांस मध्ये तल्लीन होऊन आंनद घेतला. ज्योतसना भुंदरे मंजूषा गौरकार सुनिता ढोरे योगीता उपरे ईत्यादी शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत शिबीर यशस्वी केले सुत्र संचालन सूमन भगत तर आभार सुनील परसुटकर यांनी मानले चहा पानानंतर शिबिराची सांगता करण्यात आली