A2Z सभी खबर सभी जिले की

व्यापा-यांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा – सहआयुक्त विनोद गवई

समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र:
देशात जीएसटी करप्रणाली लागु होऊन सात वर्ष झाली आहे. नवी योजना सुरू करण्यात काही अडचणी सुध्दा आल्यात. परंतु त्याचे निवारण टॅक्स प्रॅक्टिशनर, व्यापारी, उ‌द्योजक, आणि विभागाच्या एकत्र प्रयत्नांनी सर्व अडचणींवर मात केली. करदात्यांना करभरणा करण्यास सुलभता यावी याकरिता शासनातर्फे जीएसटी अभय योजना-2024 राबविण्यात येत आहे.

वित्तीय वर्ष 2017-18, 2018-19, 2019-20 करिता जे प्रलंबित प्रकरणे आहेत, तसेच दि. 31 मार्च 2025 पर्यंत फक्त कराचा भरणा केल्यास त्यावर लागणारे व्याज व दंड माफ करण्यात आलेले आहे. सदर योजना ही व्यापाऱ्यांसाठी अतिशय लाभकारक असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वस्तू व सेवाकर विभाग, चंद्रपूर चे राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी केले.

वस्तू व सेवाकर विभागातर्फे श्री. गवई यांच्या अध्यक्षतेखाली अभय योजनेसंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सादरीकरणातून जीएसटी अभय योजना-2024 बाबत सविस्तर माहिती राज्यकर अधिकारी भारतभूषण डुमरे यांनी दिली. तसेच सदर योजना किती सुलभ व व्यापाऱ्यांच्या हिताची आहे, हे पटवून दिले.

यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी निराकरण केले. कार्यक्रमाचे संचालन राज्यकर अधिकारी भुषण शहाणे यांनी केले. कार्यक्रमाला सहायक राज्यकर आयुक्त तेजराम मडावी आणि राज्यकर अधिकारी गिरीश मडावी तसेच टॅक्स बार असोसीएशन तर्फे ॲड राहील साबीर, ॲ्ड. जनार्धन बदकी, ॲड. संजय चौबे, ॲड. विलास माथनकर, ॲड. अरुण भटारकर, ॲड. नितीन डोंगरे उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!