A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

क्रूर वाल्मीक कराड ला फाशी देण्याची मागणी करत बल्लारपूर शिवसेनेचे (शिंदे गट)जोडे मारो आंदोलन


समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबयांच्या आदेशाने,पूर्व विदर्भ संघठक किरणभाऊ पांडव व सचिव प्रवक्ता व विधानपरिषद आमदार आदरणीय मनीषा ताई कायंदे,संपर्क प्रमुख किशोरजी रॉय यांच्या सूचनेनुसार,शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात आज बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर येथे, वाल्मिक कराड याला फासी द्या असे नारे,देऊन जाहीर निषेध करण्यात आला.आज दिनांक ५ मार्च २०२५ रोज बुधवार बल्लारपूर, पोंभुर्णा शिवसेनेच्या वतीने बिड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा क्रुरतेचा कळस आहे. याप्रकरणी अटकेत असलेला क्रूरकर्मा वाल्मिकी कराड याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हा वाल्मिकी नाही तर वाल्या राक्षस आहे. याचा बल्लारपूर येथे रस्त्याच्या मुख्य रोड वरील जोडे,चप्पल मारून, आंदोलन करून निषेध करण्यात आला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर तालुका येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.यावेळी विधानसभाप्रमुख विनोद चांदेकर,तालुकाप्रमुख बल्लारपूर जमील शेख, तालुकाप्रमुख पोंभुर्णा पंकज वट्टेटीवार,शहरप्रमुख पोंभुर्णा, संतोष पार्लेवार,शहरप्रमुख बल्लारपूर उमेश कुंडले,उपजिल्हाप्रमुख वैद्यकीय बालाजी सातपुते,उपतालुका प्रमुख बंडू पानपट्टे,प्रभू तांड्रा,संतोष येलमूले, संतोष शाश्त्रकार, जिशन शेख ,भावेश बोपचे, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते,आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!