
समीर वानखेडे:
जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेल्या आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकुशलतेची प्रचिती राज्याच्या अधिवेशनात पुन्हा दिसून आली. कामगारांच्या सुरक्षेसाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढाकार घेऊन लक्षवेधी मांडली.*
ताडाळी जिल्हा चंद्रपूर येथील धारीवाल इंफ्रास्टक्चर या कंपनीमध्ये अपघातामुळे कामगार दगावल्याची घटना घडल्या. या संदर्भात कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करीत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. लक्षवेधीवर कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांनी उत्तर दिले. या उत्तरात त्यांनी चंद्रपूर येथील कंपनीतील अपघातात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली नसल्याचे मान्य केले. त्यांनी यासंदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आल्याचेही सांगितले.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कामगार बांधवांची सुरक्षा महत्वाची असून त्यासाठी राज्य सरकारने कडक कायदे करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अपघातात जीव गमावलेल्या कामगारांना आर्थिक मदतीसाठी भारतीय मजदूर संघाला आंदोलन करावे लागल्याचेही त्यांनी सांगितले. कामगारांच्या सुरक्षेबाबत होत असलेला हलगर्जीपणा थांबविण्यासाठी या विषयावर बैठक घेत सविस्तर चर्चा करण्याची गरज आहे, असे नमूद करीत श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांना चंद्रपूर येथे आमंत्रित देखील केले.