
संजय पारधी चंद्रपुर महा.
चंद्रपुर : योग नृत्य परिवार मुख्यालय चंद्रपुर चे जनक भाई श्री गोपाल जी मुधंडा जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ घोडके महीला जिल्हा प्रमुख किशोरी ताई हिरुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विर बाबुराव जी पुल्लेसुर शेडमाके यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आली. चंद्रपुर येथे जन्मलेल्या या शुर विरानी जल जंगल जमीन या आदिवासी समाजाच्या हितासाठी ब्रिटीश साम्राज्या सोबत 7. महीन्यात अनेक लढाया लढले व त्यांना सळो कि पळो करुन सोडले त्यांनी ब्रिटिशा सोबत केलेल्या विद्रोहा मुळेच चंद्रपूर येथील जेलमधील पिंपळाच्या झाडाला अवघ्या 25. व्या वर्षी फांसी देण्यात आली. त्या ठिकाणी सर्वांनी जाऊन अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली कार्यक्रमास आझाद गार्डन चे केंद्र प्रमुख संतोष पिंपळकर प्रमोद बोरीकर अशोक उईके बंडुभाऊ देवोजवार सरीता दुर्गे वैशाली बावीसकर छाया हिरोळे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते आदिवासी नेते प्रमोद बोरीकर यांनी विर बाबुराव शेडमाके यांची जिवन गाथा बद्दल माहिती दीली सुत्र संचालन व आभार अश्विनी अलगमवार हिने मानले चहा पानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.