
संजय पारधी बल्लारपूर
बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे , द्वारा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. चंद्रपूर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित माउंट इंग्लिश मीडियम स्कूल बल्लारपूरने आपली उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी ९१.१०% टक्के निकाल लागला आहे. माउंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश प्राप्त केले.
कुमारी रुची मनोज खैरे हिने ८३.८०% गुण प्राप्त करत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर कुमारी अफशा अन्सार शेख हिने८२.००% गुण प्राप्त करून शाळेतून द्वितीय येण्याचा मान पटकावला. तर तृतीय क्रमांक कुमारी सायली चंदू कांबळे हिने ७६.८०% गुण संपादन केले. मयंक विवेक कार्लेकर ७५.००% गुण प्राप्त करत शाळेतून चौथा आला. तर पाचव्या स्थानावर कुमारी सरिता प्रदीप देरकर हिने ७१.४०% व योहान राजेश मेश्राम याने ७१.४०% गुण प्राप्त केले. एस एस सी बोर्ड परीक्षेत शाळेतून २३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यातून ४ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह गुण प्राप्त केले आणि ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भाऊराव झाडे तसेच संस्थेचे सचिव तथा शाळे चे प्राचार्य श्री शैलेश झाडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच अतिथी म्हणून हर्षल नवघरे, आकाश इन्स्टिट्यूट यांनी पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे प्राध्यापक श्री चेतन गाजर्लावार, प्राध्यापिका सौ श्वेता व्यवहारे, प्राध्यापिका सौ अर्चना अमराज , श्री रमिज शेख , शिक्षक इतर कर्मचारी तथा पालक वर्ग उपस्थित होते.