A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

जामखेड समस्येच्या विळख्यात; मूलभूत प्रश्नांवर नेते गप्प

Jamkhed in the grip of trouble; Leaders silent on basic issues

अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे

जामखेड शहर सध्या समस्येच्या विळख्यात सापडले आहे. याकडे लक्ष देण्यासाठी नेत्यांना वेळ नाही. जनतेला समस्येच्या सामना करत जीवन जगावे लागत आहे. अठरा महिने मुदतीचा रस्ता अडीच वर्षे झाले तरी शहरात तसाच आहे. पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात फुफाट्याचा त्रास तसेच शहरातील नागरिकांना दहा दिवसातून एकदा एक तास पाणी मिळत आहे. शहरातील वीजेबाबत तर असून अडचण व नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. सतत लाईट जाण्याच्या समस्येने जामखेड कर हैराण झाले आहेत.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग अठरा महिन्याची मुदत असताना अडीच वर्षे झाले तरी पन्नास टक्के काम पूर्ण नाही. सध्या शहरातून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाणी व चिखल मुळे रस्त्यावर खाचखळगे झाले आहेत.

रस्त्याच्या प्रश्नांबाबत जिल्ह्यातील इतर तालुक्यात खासदार निलेश लंके यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलने केली, ठेकेदार व अधिकारी यांना जाब विचारला, गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले मात्र जामखेड शहरातील रस्ते, वीज व पाणी प्रश्नांवर खासदार गप्प का असा प्रश्न जनतेला पडला आहे.

शहरातील पिण्याच्या पाण्याबाबत तर

शहरातील वीज म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी अवस्था आहे. सतत लाईट जाण्याच्या समस्येमुळे शहरातील जनता हैराण आहे. याबाबत अधिकारी सांगतात वरूनच गेली म्हणजे आष्टी वरून सततच्या लाईट जाण्याच्या समस्येमुळे सततच्या लाईट जाण्याच्या समस्येमुळे जनतेसह व्यावसायिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

खुपच अडचणी आहेत. एकेकाळी चोवीस तास पाणीपुरवठा होणारे शहर म्हणून जामखेडची ओळख होती आता दहा दिवसांतून एकदा एक तास पाणी मिळत आहे. उजणी पाणीपुरवठा योजना निधीअभावी ठप्प आहे. पन्नास टक्के काम झाले आहे. ठेकेदार म्हणतात पंचवीस टक्केच बील मिळाले आहे.

समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यावर पाऊस झाला की, सगळीकडे चिखल दलदल होते. वाहने घसरतात तर नंतर धुळीचा मोठा प्रादुर्भाव होतो. शहरवासीयांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता नेमका का होत नाही. कोणाची काय अडचण आहे. अधिकारी पदाधिकारी गप्प का ? अशी चर्चा जामखेड शहरात सुरू आहे.

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने जामखेड शहरात पाण्याचे तळे साचले गेले तसेच शहरातील काम अर्धवट असल्याने तसेच अतिक्रमण न हटविल्याने रहदारीची

लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एक दिलाने काम करून ‘उद्याच्या भविष्यातील जामखेड’ होण्यासाठी सरसकट अतिक्रमण मुक्त जामखेड करावे आता पावसाळ्यात चिखल व दलदल होणार आहे. पावसाने रस्त्यावर चालता येत नाही. तसेच रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!