?php echo do_shortcode('[t4b-ticker]'); ?
A2Z सभी खबर सभी जिले कीपुणेमहाराष्ट्रमुंबईसंगमनेर

31 मे 2025 रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती चोंडी भेटीसाठी विधान परिषदेचे सभापती प्रा.श्री. राम शिंदे यांची माहिती.

IMG 20250524 175643 IMG 20250524 175611 1

भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा.द्रोपदीजी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे भेट घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले व आदरणीय महामहीम राष्ट्रपती महोदया श्री क्षेत्र चोंडी, ता. जामखेड, जिल्हा. अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. श्री रामजी शिंदे यांनी दिली. मा. राष्ट्रपतींच्या चोंडी भेटीच्या अनुषंगाने अनेक शासकीय प्रोटोकॉलची तयारी सुरू असल्याचेही अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगृहात सभापती यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगण्यात आले.

राज्य सरकारच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांच्या विकासासाठी 5000 कोटीचा निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे व या अंतर्गत चोंडीचे विकास कामासाठी 681 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले तसेच त्याचा शासन निर्णय येत्या सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर होईल व चोंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे व त्या दृष्टीने पुढील प्रयत्न चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल असाही विश्वास व्यक्त केला. 31 में रोजी श्री क्षेत्र चोंडी गावामध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सव निमित्त वेगवेगळे उपाययोजना केल्या जातात तसेच यावर्षी तीनशेवा असल्याने तसेच राष्ट्रपतीसह राज्यपाल मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व मा.अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास येणार असल्याने तसेच देशभरातून भाविक चोंडी या ठिकाणी लाखोच्या संख्येने गर्दी करतात व याहीवर्षी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तेथील आवश्यकत्या सुविधा प्रशासकीय तयारी बाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांसह एक आढावा बैठक घेण्यात आली व कडेकोट उपायोजना करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.

Back to top button
error: Content is protected !!