A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

मंचर येथे महिला पत्रकारावर झालेल्या भ्याडहल्ल्याचा जाहीर निषेध आंदोलनाला युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे पाठिंबा.

पुणे, मंचर दि. 15 जुलै 2025 रोजी मंचर येथे महिला पत्रकार स्नेहा बारवे ह्या व्रत्तांकन करत असताना काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी त्यांना अमानुष मारहाण केली असता त्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना मंचर पोलिसांनी मोकाट सोडून साधा गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने आज मंचर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने व इतर संघटनाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करून मंचर शहरातून मोर्चा मंचर प्रांतकार्यालय येथे जाऊन निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.गणेश महाडिक, महिला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्रीमती. जयश्री घोडके, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.संतोष लांडे, पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख श्री.कांताभाऊ राठोड, पुणे जिल्हा महिला सचिव श्रीमती अनघलक्ष्मी दुर्गा, पुणे शहर अध्यक्ष श्री.रितेश सनस, खेड तालुका अध्यक्ष श्री.हंसराज पाटील यांच्या उपस्थितीत व आंबेगाव तालुक्यातील अनेक पत्रकारानी आंदोलनात सहभागी नोंदवला व मोर्चा शांततेत काढत घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या व मुलाखती देऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडून ग्वाही घेण्यात आली की लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी.

इथून पुढे अशा प्रकारच्या कुठल्याही पत्रकारांवर अन्याय झाला तर तो सहन केला जाणार नाही. असा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडसावुन सांगण्यात आले व शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी यासाठी निवेदन देण्यात आले.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!