A2Z सभी खबर सभी जिले कीधाराशिवपुणेमहाराष्ट्रमुंबई

कात्रज येथून अपहरण केलेल्या 2 वर्षाच्या मुलीची धाराशिव जिल्ह्यातून सुखरूप सुटका

भिक मागण्यासाठी अपहरण केलेल्या टोळीचा पर्दाफाश

पुणे भारती विद्यापीठ: 

    दिनांक 25 जुलै रात्री 09:00 ते 26 जुलै 2025 रोजी रात्री 01:30 च्या दरम्यान फिर्यादी धनसिंग हनुमंत काळे वय 25 धंदा मजुरी राहणार वंडरसिटी झोपडपट्टी, पाण्याची टाकीजवळ, कात्रज पुणे या ठिकाणाहून यांची मुलगी वय दोन वर्ष हीच कोणीतरी झोपेतून उचलून पळून नेले म्हणून तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुना रजि नंबर 353/2025 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) दिनांक 26 जुलै 25 रोजी 7:45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. 

     वरील गुन्ह्याची दखल पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी घेत पीडित दोन वर्षाच्या मुलीला तात्काळ शोध घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल खिल्लारे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार केली. गुन्ह्याच्या घटनास्थळापासून सी सी टीव्ही तपासण्यास सुरुवात झाली 140 सी सी टीव्ही कॅमेरे चेक केले असता दोन पुरुष व एक महिला एका दुचाकीवरून पीडित मुलीला पुणे रेल्वे स्टेशन मध्ये घेऊन जाताना दिसून आले. पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही फुटेज पाहणी करतेवेळी पीडित मुलीला पळवून आणणाऱ्या तीन इसमांच्या सोबत आणखीन दोन आरोपी असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी त्यांच्या चेहरे स्पष्ट करून आरोपींची गोपनीय माहिती घेतली असता सदर आरोपी हे तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती भारतीय विद्यापीठ तपास पथकाला मिळाली.

   वरिष्ठांच्या मार्गदर्शकतेखाली पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर व अंमलदार अशी दोन पथके तुळजापूर जिल्हा धाराशिव एल सी बी पोलिसांच्या मदतीने आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून 3 आरोपीस ताब्यात घेतले. 1. सुनील सिताराम भोसले व 51 मजुरी रा. मोतीझारा तुळजापूर धाराशिव, 2. शंकर उजण्या पवार वय 50 वर्ष रा. डिकमाळ पारधी वस्ती तुळजापूर धाराशिव, 3. शालुबाई प्रकाश काळे वय 45 रा. डिकमाळ पारधी वस्ती तुळजापूर धाराशिव. 4. गणेश बाबू पवार वय 35 रा. डिकमाळ पारधी वस्ती तुळजापूर धाराशिव, 5. मंगल हरफुल काळे वय 19 वर्ष रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी खडकी पुणे. वरील आरोपींना 29 जुलै 25 रोजी सकाळी अटक केली असून तपासामध्ये आरोपींनी पीडित मुलीला भीक मागण्यासाठी तिचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. बी एम एस कलम 139 3(5) ची कलम वाढ करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता 2ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर आहे दाखल गुन्ह्याचा तपास स. पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील हे अधिक तपास करीत आहे.

   सदर कामगिरी ही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,  स. पोलीस आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस स. आयुक्त पुणे शहर पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे राजेश बनसोडे, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पुणे शहर मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 पुणे शहर राजेंद्र मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन पुणे शहर राहुल आवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम, गुन्हे शाखा युनिट 1 पोलीस निरीक्षक कुमार घाटे, गणेशा का युनिट 2 पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, सय्यद पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, मितेश चोरमले, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, तसेच गुन्हे शाखा 2 कडे अमलदार सपोफौ जाधव, पोलीस हवालदार शंकर कुंभार, आबा मोकाशी, विजय पवार, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओम कुंभार, संतोष टकले, राहुल शिंदे, साधना ताम्हणे, निखिल जाधव, सुदाम तांबोळी, शुभम देसाई, मयूर भोसले, निलेश साबळे, अतिम जमदाडे तसेच धाराशिव एलसीबी चे पोलीस हॉलर समाधान वाघमारे यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. या उत्कृष्ट कामगिरीचे पुणे शहरामध्ये कौतुक करण्यात येत आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन टीम यासाठी 100,000/ रुपये व गुन्हे शाखा पुणे शहर यांना 100,000/ रुपये बक्षीस जाहीर केले आहे. 

Back to top button
error: Content is protected !!