Press Note
Nashik
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी ठरलं, महापालिका निवडणूक डिसेंबर-जानेवारीत!
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार २८ टक्के ओबीसी आरक्षणासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालेले असताना निवडणूक कधी लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर ते जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक होईल, असे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
अनेक महत्त्वांच्या महापालिकांचा कार्यकाळ संपून तीन-चार वर्ष सरलेली आहेत. नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषदेची देखील तीच तऱ्हा आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेमुळे निवडणुका रखडल्या होत्या. परंतु २८ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज नाशिकमध्ये आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी त्यांना विचारण्यात आले असता डिसेंबर जानेवारी दरम्यान निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापरही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती की जिल्हा परिषद यापैकी पहिली निवडणूक कोणती होणार, याबाबत अद्याप निश्चिती नाही. मनुष्यबळाचा विचार करून टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही
देशात राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत ज्या निवडणुका होतात त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होता. या निवडणुकांत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होत नाही. प्रभा पद्धतीमुळे एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. त्यांच्या मतांची मोजणी करावी लागते. त्यामुळे व्हीव्हीपॅटची वापर करता येत नाही. ज्यावेळी मतदारसंघातून एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो त्यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येतो, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला तर ही प्रक्रिया अधिकाधिक वेळकाढू असू शकते, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी त्यांना विचारण्यात आले असता डिसेंबर जानेवारी दरम्यान निवडणुका होऊ शकतात.
महापालिका निवडणूक
महापालिका निवडणूक
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार २८ टक्के ओबीसी आरक्षणासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालेले असताना निवडणूक कधी लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर ते जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक होईल, असे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
अनेक महत्त्वांच्या महापालिकांचा कार्यकाळ संपून तीन-चार वर्ष सरलेली आहेत. नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषदेची देखील तीच तऱ्हा आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेमुळे निवडणुका रखडल्या होत्या. परंतु २८ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज नाशिकमध्ये आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी त्यांना विचारण्यात आले असता डिसेंबर जानेवारी दरम्यान निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
महापालिका की पंचायत समिती-जिल्हा परिषद, पहिली निवडणूक कोणती होणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापरही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती की जिल्हा परिषद यापैकी पहिली निवडणूक कोणती होणार, याबाबत अद्याप निश्चिती नाही. मनुष्यबळाचा विचार करून टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही
देशात राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत ज्या निवडणुका होतात त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होता. या निवडणुकांत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होत नाही. प्रभा पद्धतीमुळे एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. त्यांच्या मतांची मोजणी करावी लागते. त्यामुळे व्हीव्हीपॅटची वापर करता येत नाही. ज्यावेळी मतदारसंघातून एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो त्यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येतो, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला तर ही प्रक्रिया अधिकाधिक वेळकाढू असू शकते, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या:
एकूण संस्था: महाराष्ट्रातील एकूण ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायती यांचा समावेश आहे.
महानगरपालिका: महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका आहेत.
नगरपालिका आणि नगरपरिषद: महाराष्ट्रात सध्या सुमारे 241 नगरपालिका आणि नगरपरिषदा आहेत.
जिल्हा परिषदा: 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015