A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

एम.जे.एफ. कनिष्ठ महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीचे आयोजन

 

 

 

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर संचालित महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम कनिष्ठ महाविद्यालय, वाणिज्य विभागामार्फत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिवाकर मोहितकर, इंग्रजी माध्यमाचे पर्यवेक्षक प्रा. कृष्णा लाभे तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. सतीश कर्णासे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांनी भूषवले. बारावीच्या विद्यार्थिनी दिशा निशाद आणि आफरीन शेख यांनी संयोजन कौशल्य दाखवत कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक प्रा. कृष्णा लाभे यांनी करताना नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचे महत्त्व पटवून दिले. स्वागतगीताने वातावरणात आनंद व उत्साहाची लहर निर्माण झाली. या प्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी शिवानी कुमारी हिने आपले मनोगत व्यक्त केले. सध्या नागपूर येथे कंपनी सेक्रेटरी कोर्स करत असलेल्या शिवानी हिने शैक्षणिक जीवनातील अनुभव सांगत नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनाही आमंत्रित करून त्यांना जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली.
फ्रेशर्स पार्टीच्या माध्यमातून जुन्या व नवीन विद्यार्थ्यांमध्ये ओळख वाढावी, संवाद आणि स्नेह वृद्धिंगत व्हावा हा उद्देश साध्य करण्यात आला. अनेक नवीन विद्यार्थ्यांनी आपले विचार व भावना व्यक्त करत या संधीचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शिक्षक दिव्या वर्मा, आदिती गहेरवार, सोनाली कायरकर व पल्लवी खनके यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Back to top button
error: Content is protected !!