
प्रेस नोट
शिवाजी महाविद्यालयाजवळ,मार्लिवार पटांगण
गडचिरोली
*गडचिरोलीत भाजपाची भव्य प्रचार सभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार..*
————————————–
*मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचेही भाजपाच्या विजयासाठी मार्गदर्शन..*
दि. २९ नोव्हेंबर २०२५ | गडचिरोली
गडचिरोली, आरमोरी आणि वडसा (देसाईगंज) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित भव्य प्रचार सभेला गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालयाजवळील मार्लिवार पटांगणावर कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेच्या प्रारंभापासूनच घोषणांच्या गजरात, तुफान उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात हा प्रचार मेळावा संपन्न झाला.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी भाषण : “संकल्प विकासाचा – विश्वास विजयाचा”*
या सभेला महाराष्ट्राचे लोकप्रिय, लाडके मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहून जनतेला विकासाचा ठाम संदेश देत म्हणाले— “माझं गडचिरोलीवर अपार प्रेम आहे. मी सतत जिल्ह्यात येतो, इथल्या प्रत्येक अडचणींची जाण ठेवून त्यावर उपाययोजना करतो. मागील काही वर्षांत जाणीवपूर्वक गडचिरोलीला मागे ठेवण्यात आले; पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सत्तेत आल्यानंतर गडचिरोलीला निधीची अबाधित साथ मिळाली आणि हा जिल्हा विकासाच्या मार्गावर वेगाने धावू लागला.”
ते पुढे म्हणाले—
“मागील नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या कार्यकाळात अनेक कोटींची विकासकामे झाली. आता शहराला आणखी वेगाने पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.”
“गोरगरीब जनतेचे जीवनमान उंचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. शहरात निर्माण होणारी गदंगी, घनकचरा, नाल्यांचे प्रश्न, आरोग्याच्या अडचणी—याचे समाधान मोठ्या प्रमाणात निधी देऊनच करता येईल, आणि तो निधी देण्याचा शब्द मी आज देतो.”
“स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हजारो कोटींचा निधी शहराच्या विकासासाठी आणण्यात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मौलाचा वाटा आहे. गडचिरोलीत वाढीव पाणीपुरवठ्यासाठी १३० कोटींची योजना आपण निवडून आल्यानंतर तत्काळ मंजूर केली जाईल. भुयारी गटार योजना आणि अटल अमृत योजनेतूनही गडचिरोलीचा विकास होणार आहे.”
“गडचिरोलीतील अतिक्रमणे नियमित करून घरकुल योजना राबवू. स्टील हबमध्ये मोठी गुंतवणूक होणार असून जंगल, जमीन, जल जपत जिल्ह्यास आधुनिक विकासाचा चेहरा देऊ.”
“आरोग्य सुविधा सर्व प्रकारच्या गडचिरोलीत आणू—हे आम्ही ठरवले आहे.”
सभेच्या अखेरीस मुख्यमंत्री म्हणाले— “२ तारखेला कमळाच्या चिन्हावर बटन दाबा. प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून द्या. ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही—याची मी वैयक्तिक हमी देतो. संकल्प विकासाचा आणि विश्वास विजयाचा!”
*मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे दमदार भाषण : “लक्ष्मी कमळावरच बसते—२ तारखेला कमळावरच मतदान करा”*
प्रचार सभेत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उत्साहवर्धक भाषण करत मतदारांना आत्मविश्वास दिला. ते म्हणाले— “गडचिरोली महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. मेडिकल कॉलेजसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पात त्यांचा मोलाचा वाटा आहे.”
ते पुढे हसत-खेळत जनतेला पटवून म्हणाले—“लक्ष्मी ही कमळावर बसते; तुटलेल्या पंजावर, हत्तीवर, उंटावर, बंद पडलेल्या घड्याळावर कधी बसत नाही! त्यामुळे २ तारखेला कमळावर मतदान करा.
डॉ. नेते पुढे म्हणाले—
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय देशाला नव्या उंचीवर घेऊन गेले. त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली—हे माझे भाग्य. म्हणूनच गडचिरोली नगरपरिषदेतही सत्ता भाजपा चीच असणे गरजेचे आहे.”
नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांचा विकासाचा संकल्प..
गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अँड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर), आरमोरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपेश पुणेकर,वडसा (देसाईगंज) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लताताई सुंदरकर या तिन्ही उमेदवारांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती : उत्साहात कार्यकर्त्यांची दणदणीत गर्दी..
या प्रचार सभेत मंचावर भाजपा चे प्रामुख्याने मान्यवर
आमदार तथा गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी बंटी भाऊ ऊर्फ किर्ती कुमार भांगडिया, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे,माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,माजी आमदार क्रिष्णा भाऊ गजबे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेङडीवार,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, समन्वयक प्रमोद पिपरे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे,
जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे,श्री. निंबोरकर, श्री. भांडेकर,किसन नागदेवे, बबलु भैया हुसैनी, सतिश चिचघरे, अतुलभाऊ मल्लेलवार
तसेच हजारोंच्या संख्येने महिला कार्यकर्त्या, युवक, समर्थक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
गडचिरोलीने आज विकासाच्या नव्या पर्वाची हाक दिली आहे.
भाजपाची ही विराट प्रचार सभा जिल्ह्यात नव्या आशा, विकासाची नवी ऊर्जा आणि विजयाचा आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015







