
प्रेस नोट
श्रीरामपुर,अहिल्यानगर
*श्रीरामपुरात उत्साहात मतदानाला सुरुवात;उमेदवारांचे भवितव्य कैद होणार…*
श्रीरामपूर(शिवप्रहार न्यूज) श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली.मतदानासाठी नागरिकांमध्ये,मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून सकाळीच नागरिकांनी मतदान करण्यासाठी घाईगडबड केलेली दिसली.काही ठिकाणी मतदान यंत्र सुरू होण्यास थोडासा विलंब झाला.परंतु सुरळीत मतदान प्रक्रिया चालू झाली असून मतदान करताना मतदारांमध्ये उत्साह निर्माण झालेला पहायला मिळत आहे.
दरम्यान आज उमेदवारांचे भवितव्य कैद होणार आहे.उद्या ०३ डिसेंबर २०२५ रोजी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015







