A2Z सभी खबर सभी जिले की

अखेर रस्त्याचे बांधकाम सुरू प्रेम वनवे यांच्या प्रयत्नाला यश विलास केजरकर भंडारा.

‌प्रेस नोट
कवडसी ते नांदोरा, नांदोरा- शहापुर
भंडारा

अखेर रस्त्याचे बांधकाम सुरू
प्रेम वनवे यांच्या प्रयत्नाला यश

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवाटरचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्ता फारच खराब झालेला आहे. त्यामुळे नागरीक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पाण्याची पातळी वाढतच आहे. कवडसी ते नांदोरा, नांदोरा- शहापुर रस्त्यावर गोसेखुर्द च्या वाढत्या पाण्यामुळे दोन्ही गावाचे संपर्क तुटले असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाली आहे.‌ म्हणून या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे यांना सांगण्यात आले. तेव्हा वनवे यांनी त्वरित गोसेखुचे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करताच कवडसी ते नांदोरा, नांदोरा- शहापुर मार्गाचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात आले.
सविस्तर माहितीनुसार गोसेखुर्द धरणाच्या बॅकवाटरचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे, त्यामुळे सदर रस्ता खराब झाला आहे. व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून त्वरित बांधकाम करण्याची सुचना दिल्या. त्यामुळे संबंधित विभागाने लगेच रस्त्याचे बांधकाम सुरू केले.
यावरून जिल्हा परिषद सदस्य असावे तर प्रेम वनवे सारखे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे यांचे मोहन कारेमोरे, गोलू वनवे, अंताराम खराबे, रवि बारई, महेश सदावर्ती, उमेश डोंगरे व नांदोरा, कवडसी, सालेबर्डी, शहापूर, साहुली परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!