A2Z सभी खबर सभी जिले की

संगमनेर तालुक्यातील साकुर येथील ज्वेलर्स च्या दुकानात भरदिवसा घातलेल्या दरोड्यातील दोघे जण पोलीस व ग्रामस्थांनी पकडले

संगमनेर : तालुक्यातील साकुर येथे घडलेल्या ज्वेलर्स दुकानातील दरोड्यातील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या संयुक्त तपास पथकांना यश आले आहे. सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील साकूर येथे काल दुपारी पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दूकानच लूटून नेल्याची घटना घडली होती. विशेषतः भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तसेच दूकानाबाहेर येऊन या दरोडेखोरांनी हवेत फायरिंग करत तेथूनच पसार झाले होते. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांच पथक रवाना झाले होते. दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोराला पारनेर तालुक्यातील कुरणवाडी – जांभुळवाडी परिसरातून जेरबंद करण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आलीय. यापैकी एक दरोडेखोर बारामतीचा असल्याची माहिती समोर आलीय. तसेच मोटारसायकल ही ताब्यात घेतल्या आहेत. उर्वरित ३ दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान सदर दरोडेखोर डोंगरात लपून बसलेली माहिती पोलिसांना मिळाली होती.
मात्र घटनास्थळापासुन 25 किलोमीटर अंतरावरच वासुंदे ता.पारनेर शिवारात काल दुपारपासुनच पोलीसांनी आरोपींची नाकाबंदी केली होती.
साकूर बसस्थानकजवळ निखील सुभाष लोळगे यांच कान्हा ज्वेलर्स चे दूकान आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास दूकानातील कामगार जेवण करायला गेले होते. दूकानात एक जण कामगार होता. याच वेळी दोन पल्सर गाडीवर पाच दरोडेखोर दुकानासमोर आले. या दरोडेखोरांनी थेट कान्हा ज्वेलर्सच्या दूकानात घुसून कामगाराला बंदूकीचा धाक दाखवत संपूर्ण सोन्याचा मालच लूटून नेला.दरोडेखोरांनी गंठण, चैनी, मंगळसूत्र, वाट्या, कान चैनी, मिनी गंठण, टॉप्स, बाळ्या आदि सोन्याचं माल घेऊन पारनेरच्या दिशेने फरार झाले आहे. यावेळी दरोडेखोरांनी पळून जाताना फायरिंग केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान ही घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अक्षरशः एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दूकानाची पाहणी करत काही पोलिस कर्मचारी थेट दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मार्गस्थ झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगरचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच ठसे तज्ज्ञ, श्नान पथकाने घटनास्थळी दाखल झाले होते.
या घटनेनंतर दरोडेखोरांच्या मागावर गेलेल्या घारगाव पोलिसांना पारनेर पोलिसांची साथ मिळाली. त्यामुळे या दोन्ही पथकांनी दरोडेखोरांचा वासुंदे (ता.पारनेर) पर्यंत त्यांचा पाठलाग केला. आज पहाटेच्या सुमारास सुरुवातीला एकाला आणि नंतर दुसर्‍याला ताब्यात घेतले आहे.साकूर बसस्थानकाच्या परिसरात संकेत सुभाष लोळगे यांच्या सराफा दुकानात तोंडाला स्कार्प गुंडाळलेले पाचजण शिरले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. घारगाव पोलीस आणि पारनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने वासुंदेपर्यंत त्यांचा पाठलाग केला. रस्ताच संपल्याने दरोडेखोरांनी आपल्या दोन्ही दुचाकी सोडून देत डोंगरातून पळ काढला. अखेर रानात दडून बसला एकजण भल्या सकाळी पोलीस आणि ग्रामस्थांच्या हाती लागला. तर त्यानंतर काही वेळातच दुसराही सापडला.

वंदे भारत टीव्ही न्यूज करीता शहाजी दिघे

Discover more from Vande Bharat Live Tv News

Subscribe to get the latest posts sent to your email.

Back to top button
error: Content is protected !!

Discover more from Vande Bharat Live Tv News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading