
संगमनेर : स्वातंत्र्यप्राप्ती काळा नंतर काँग्रेसमुळे देशाचा विकास झाला आहे.राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्मसमभाव आणि संविधान जपणारा हा पक्ष असल्याने या पक्षाचे भवितव्य उज्वल असून काँग्रेस विधिमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष सोपान तांबडे यांचा आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांना तांबडे यांचा सत्कार करून पक्षात स्वागत केले.
रासपाचे तालुकाध्यक्ष सोपान तांबडे यांच्यासह डिग्रस गावचे युवा नेते सोमनाथ वारे यांचा आदिवासी युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे मोठा त्याग व बलि दान आहे. देशाच्या विकासात काँग्रेसचे अत्यंत महत्वपूर्ण योगदान असून देशांमध्ये काँग्रेस पक्ष उभारी घेत आहे.महाविकास आघाडीवर लोकांचा विश्वास वाढला आहे संविधान वाचवणारा हा पक्ष असून काँग्रेस गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासा साठी सतत काम करणारा पक्ष आहे.या पक्षाची विचारधारा ही लोकशाहीला समर्पित आहे. काँग्रेसमध्ये तरुणांना भविष्यात मोठी संधी असल्याचे हि ते यावेळी म्हणाले.
सोपान तांबडे म्हणाले कि, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन गोरगरिब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांचे राज्यव्यापी नेतृत्व असून त्यांच्यामुळे संगमनेर तालुक्याचा राज्यात सन्मान होत आहे.हे सर्व तरुणांसाठी अभिमानास्पद आहे.यापुढील काळात काँग्रेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त जन विकासाची कामे करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रासपमधून एकनाथ बिडगर बाळासाहेब वावरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला आहे.
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.