A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

विवेक आंबेकर यांचा सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ.

संजय पारधी चंद्रपूर, महाराष्ट्र

चंद्रपूर : विद्यानिकेतन चंद्रपूर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री विवेक आंबेकर यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम चंद्रपूर येथील यंग रेस्टॉरंट इथे घेण्यात आला. याप्रसंगी विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री विवेक आंबेकर यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भेटवस्तू दिल्या. तसेच आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक श्री सुभाष भांडारकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शर्मिला पेंडके यांनी केले.
याप्रसंगी श्री प्रवीण कडू, वैशाली धर्माधिकारी, शारदा ठाकूर , कपिला गोरंटीवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री सुभाष भांडारकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री विवेक आंबेकर यांच्या पुढाकाराने शाळेत सावित्रीबाई फुले जयंती पुरस्कार, महिला दिन पुरस्कार, शिक्षक दिन पुरस्काराची सुरुवात करण्यात आली व शिक्षकांना त्यांच्या अधिकाराबाबत जागृत करण्याचे कार्य व शिक्षण कायद्याविषयीची माहिती पटवून देण्याचे काम झाले. तसेच शिक्षकांना ग्रॅच्युइटी, पीएफ, नियुक्तीपत्र, सी एल, इ एल व बँकेतर्फे वेतन खातेदारांना मिळणारा आयुष्य विमा योजना लागू करण्याबाबतचे जागृती कार्य करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना व आपले मनोगत व्यक्त करताना श्री विवेक आंबेकर यांनी आपल्याला शिक्षकांची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री जैन सेवा समितीचे आभार व्यक्त केले. सेवा काळात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले. शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केव्हाही अडचण आल्यास आपण सहकार्य करण्यासाठी नेहमी तयार राहू असेही ते याप्रसंगी म्हटले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत बिट्टुरवार व आभार प्रदर्शन वसंत हजारे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यानिकेतन शाळेतील बहुसंख्य शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!