A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

माराई पाटण गंगा माता मंदिरात योगनृत्याचे शिबीर.

WhatsApp Image 2024 12 02 at 19.34.18

संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्रा

जिवती :  माराई पाटण गंगा माता मंदिर तह. जिवती येथे योगनृत्याचे ऐक दिवसीय शिबिराचे आयोजन योगनृत्य पोलीस मुख्यालय फुटबाल ग्राउंड चंद्रपूर तर्फे करण्यात आले योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर जनक भाईश्री गोपालजी मुंधडा जिल्हा प्रभारी सुरेश घोडके जिल्हा महिला प्रभारी किशोरीताई हिरुडकर यांच्या मार्गदर्शनात सदर शिबिराच आयोजन करण्यात आले गंगा माता माराई पाटण चे पुजारी सीताराम कोटनाके पोलीस पाटील राहुल सोनकांबळे ग्राम पंचायत कर्मचारी बालाजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्तितीत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक पडगेलवार विठ्ठल देशमुख केंद्र प्रमुख निशा राजपूत संगीता जुनघरे राधा देवगिरकर निता नागतुरे अर्चना टेवरे इत्यादीच्या नेतृत्वात योगडान्स् चा क्लास घेण्यात आला यामुळे शरीर तंदुरुस्त राहते रोगप्रतिकार शक्ती वाढते रोगापासून कोसो दूर राहते सकाळी लवकर उठण्याची सवय लागते वन परीक्षेत्रातील थंडीचा फायदा घेता येतो असे अशोक पडगेलवार यांनी उपस्तित भक्तगनांना व जनतेला संबोधित करताना सांगितले शिबिराच्याच अनुषंगाने नारायण पाटन येथील शाहिद स्मारकास भेट देऊन 10.8.89 ला झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहिद झालेल्या 9. पोलीस बांधव जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली निसर्गरम्य वातावरणाचा व दरी खोऱ्याचा आनंद घेत पुरातन विष्णू मंदिर माणिकगड किल्ला पाहून अमल नाला धरन येथील वॉटर पार्क व बोटिंगचा मनमुराद आनंद लुटण्यात आला विशेष म्हणजे स्वतःच स्वयंपाक करून दाल फ्राय वांग्याचे भरीत मिरचीचा ठेचा झुणका भाकर व गरमागरम भाज्यावर ताव मारीत निरोप घेऊन सांगता करण्यात आली सर्वांनी सहकार्य करून मौज मजा गाणे डान्स करीत आनंदाने सफरचा आनंद घेत सांगता करण्यात आली.

Show More
Back to top button
error: Content is protected !!