अहिल्यानगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या कांदाचाळ, ट्रॅक्टर, पॉवर टिलरच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कांदाचाळ करण्यासाठीची मर्यादाही वाढली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर अनुदानाच्या आर्थिक मापदंडात बदल करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानच्या नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनेक योजनांचा लाभ दिला जातो. त्यासाठी अनुदान देण्यात येते. पाच वर्षांपासून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरावे लागत आहेत. एकाच अर्जात आता विविध योजनांचा लाभ दिला जातो. अलिकडच्या काळात साहित्याचे दर वाढल्याने अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात होती. कांदाचाळ उभारणी वाढेल राज्यातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील काही भागांत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे राज्यात कांदाचाळ बंधण्यासाठी अनुदान मिळावे, अशी मागणी अधिक आहे. कांदाचाळीसाठी लागणारे लोखंड व अन्य साहित्यांचे दर चार वर्षांत दुपटीने वाढले. अनुदान मात्र जुन्याच पद्धतीने दिले जात होते. साहित्याचे दर वाढल्याने व अनुदान कमी असल्याने कृषी विभागाच्या कांदाचाळ उभारणीवर परिणाम होत असल्याबाबत ‘ॲग्रोवन’नेही अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले. आता अनुदानात वाढ झाली असून पंचवीस टनी कांदाचाळीसाठी ३७ हजार ५०० रुपये अधिक मिळणार असल्याने कांदाचाळ उभारणीला वेग येईल, अशी शक्यता आहे. कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने नुकत्याच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानच्या विविध योजनांच्या अनुदान दराबाबतचे मापदंड निश्चित करून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कांदाचाळीच्या अनुदानात आता वाढ करण्यात आली आहे. पूर्वी २५ टनांपर्यंत कांदाचाळ उभारणीची मर्यादा होती. प्रति टन सात हजारांचा खर्च गृहीत धरून प्रति टनाला पन्नास टक्के म्हणजे साडेतीन हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. आता २५ टनांपर्यंतचे प्रति टनाचे अनुदान पाच हजार रुपये केले आहे. आता कांदाचाळ मर्यादाही वाढली आहे. २५ टनांपासून ५०० टनांपर्यंत ८ हजार रुपये टनाला खर्च गृहीत धरून ४ हजार रुपये अनुदान मिळेल. शिवाय आता १ हजार टनापर्यंत कांदाचाळ करता येईल. त्याला ६ हजार रुपये प्रति टन खर्च गृहीत धरून तीन हजार रुपये टनाला अनुदान मिळेल. आहे. अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना २० बीएचपी (२ डब्लूडी) क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी पूर्वी १ लाखाचे अनुदान मिळत होते. ते आता २ लाख रुपये केले आहे. तर इतर शेतकऱ्यांसाठी ७५ हजारांचे अनुदान मिळायचे ते १ लाख ६० हजार रुपये केले आहे. अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८ एचपीच्या पॉवर टिलरसाठी पूर्वी ७५ हजारांचे अनुदान मिळायचे ते आता १ लाख तर इतर शेतकऱ्यांना ६५ हजार रुपये मिळायचे, ते आता ८० हजार रुपये करण्यात आले आहे. ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानातही वाढ झाली
टीकमगढ़ जिले के खरगापुर तहसील के पास ग्राम पिपरा मडोरी में बजरंग दल के कार्यकर्ताओं ने गौ तस्करों को किया पुलिस के हवाले
06/08/2026
घोडबंदर हाइवे-84 बना मौत का खाई: गड्ढों का साम्राज्य और जनता बेहाल, सत्ता के गलियारों में बैठे हुक्मरान अपनी सियासत में मस्त!
06/08/2026
उपायुक्त की में जिला अनुकंपा समिति की बैठक आयोजित
06/08/2026
नगर पुलिस अधीक्षक गया द्वारा पुलिस कार्यालय गया के सभी अनुमंडल पुलिस पदाधिकारी, सभी अंचल पुलिस पदाधिकारी एवं जिले के सभी थानाध्यक्षों के साथ अपराध नियंत्रण अनुसंधान की गुणवत्ता तथा विधि व्यवस्था के प्रभावी क्रियान्वयन को लेकर समीक्षा बैठक आयोजित की गई l
06/08/2026
दारूल उलूम रज़ा-ए-मुस्तफ़ा में महिलाओं को स्वरोजगार का प्रशिक्षण, बैग निर्माण के गुर सीखीं प्रतिभागी
06/08/2026
गया नियोजनालय के जॉब कैंप में 53अभ्यर्थियों का प्रथम चरण के साक्षात्कार के लिए चयन l
06/08/2026
डी ए पी के वैकल्पिक उर्वरक को बढ़ावा देने हेतु प्रशिक्षण एवं प्रत्यक्षण आयोजित l
06/08/2026
ग्राम सेवा शिविर में वर्षों पुरानी समस्या का हुआ समाधान दूदाराम को मिला पुश्तैनी मकान का पट्टा’
06/08/2026
पाली में 73.17 करोड़ रुपये के प्रस्तावित विकास कार्यों पर आयोजित हुआ आरयूआईडीपी संवाद’
06/08/2026
भू-माफियाओं के खिलाफ जनआंदोलन का ऐलान, 8 अगस्त को भवनाथपुर विधानसभा क्षेत्र से उमड़ेगा जनसैलाब
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!