A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय व राज्यस्तरावर घवघवीत कामगिरी

IMG 20260110 WA0024 2

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील दोन खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला उजाळा दिला आहे. महाविद्यालयाचा बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी इंद्रजीत रॉय याची फुटबॉल या क्रीडा प्रकारात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या संघात निवड झाली. पारुल विद्यापीठ, वडोदरा (पंजाब) येथे दिनांक ५ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत त्याने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील ११ वी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी यश पेंदे याने मध्यप्रदेश येथे दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या राष्ट्रीय पारंपारिक लाठी खेळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळविले. या दोन्ही खेळाडूंच्या यशामागे प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, शारीरिक शिक्षण प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्था अध्यक्ष संजय कायरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इंद्रजीत रॉय व यश पेंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!