शेत जमीन घेण्याची बळजबरी *. सरपंच जोमात आणि शेतकरी कोमात*
सावनेर तालुक्यातील घटना
केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
सरपंच पदाचा गैरवापर व दादागिरी ची भाषा
विठोबा शामरावजी महाजन (वाडी) वय 55 वर्षे राहणार तेलगाव तहसील कळमेश्वर जिल्हा नागपूर शेतकरी यांच्या माहितीनुसार
सावनेर तालुक्यातील तेलंग खेडी गावातील सरपंच साहेब प्रशांत जी देशमुख यांनी विठोबाची महाजन (वाडी) यांच्या वडिलोपार्जित शेती जमिनीवर बळजबरीने हक्क बजावत असताना दिनांक 19/6/ 2024 बुधवार ला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान मोजा तेलंग खेडी शेत सर्वे क्रमांक 163, आराजी 1.07 यांच्या शेतावर बळजबरीने पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न व विठोबा शामरावजी महाजन (वाडी )त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर पेरणी न करण्यासाठी दबाव टाकने हा सर्व प्रकार आज सकाळी साडेआठच्या दरम्यान तेलंखडी शिवारामध्ये घडला या घटने ची माहिती युवासेना(शिंदे गट)तालुकाप्रमुख मंगेश भाऊ गमे यांना कळताच ते लगेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले व त्यांनी केळवत पोलीस स्टेशनची धाव घेतली व रिपोर्ट देऊन सावनेर एसडीएम साहेब श्री संपत जी खलाटे साहेब यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्याला समाधान केले व त्यांना आश्वासन दिले की तुम्ही शुक्रवारला पेरणी करा पुढील कारवाई केळवद पोलीस स्टेशन करीत आहे
चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी
सिटी इंडिया न्यूज