
प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
*प्रसाद योजना तीर्थक्षेत्र विकास आराखडा संघर्ष समिती तुळजापूर*
प्रति मा . आमदार राणाजगजीतसिंह पाटील 1) तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दर्शन मंडपास प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग फक्त मंदिराच्या समोरुनच असावा . दर्शन मंडपाच्या पाठीमागील बाजू आरादवाडी येथून भाविकांना दर्शन मंडपात प्रवेश किंवा मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग नसावा . 2) रामदारा तलाव नजीक दोनशे एकर मध्ये डेव्हलप प्लॅनमध्ये भक्तांसाठी भक्तनिवास न करता शहरातील इतर भागात भक्त निवास बांधावेत . 3) दिव्यांग व वृद्ध भाविकांना मंदिराच्या समोरूनच महाद्वार मधूनच लिफ्ट किंवा माध्यमातून मंदिरात दर्शनाची व्यवस्था करणे . 4) तिर्थक्षेत्र विकास आराखडा करत आस्ताना धार्मिक व पर्यटन दोन वेगवेगळी कॅटेगिरी करावी तुळजापूरला येणारा 100% भाविक हा प्रथम शहरातच आला पाहिजे . देवीचे दर्शन ,कुलधर्म कुलाचार झाल्या नंतरच पर्यटन पॉईंट ना भेट देईल आशी व्यवस्था करावी .त्या मुळे शहरातील पुजारी , व्यापारी , लॉजिंग वाले , छोटे व्यावसायिक , रीक्षा वाले , हॉटेलिंग वाले यां सर्वांचे अर्थकारण व्यवस्थित चालेल . 4) सर्वे नंबर 221 व 222 प्रस्तावित अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह मागील जागेमध्ये पंढरपूरच्या धर्तीवर मोठे भव्य दिव्य भक्तनिवास बांधावे जेणे करून भाविकांना अत्य अल्प दरात मध्ये रुम उपलब्ध होतील . 5) सर्वे क्रमांक 221व 222 या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नाट्यगृहाची उभारणी करण्यात यावी 6) शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शहरातील प्रत्येक पुजारी बहूल भागामध्ये अत्याधुनिक पार्किंगची व्यवस्था करणे .1 : पापनाश गल्ली व मंगळववर पेठ मध्ये राहणाऱ्या पुजारी बांधवांच्या भक्तांसाठी तहसील शेजारील जुना सरकारी दवाखाना या ठिकाणी . 2: कमान वेस व रावळ गल्ली या भागात राहणाऱ्या पुजारी बांधवांच्या भक्तासाठी भाई उद्धव पाटील सभागृह याठिकाणी . 3: साळुंके गल्ली , भोसले गल्ली , खडकाळ गल्ली मंकावती गल्ली व शुक्रवार पेठ भागातील पुजारी बांधवाच्या भक्तांसाठी सुरेख स्मृती रेस्ट हाऊस व आठवडा बाजाराची जागा एकत्र करून त्या ठिकाणी . सदरील जुना सरकारी दवाखान्याची जागा सध्या परिस्थितीमध्ये वापरात नसल्याने त्या ठिकाणी पार्किंग योग्य राहिल . तसेच सध्याचे आठवडा बाजार व सुरेख स्मृती रेस्ट हाऊस या ठिकाणी पार्किंग झाली तर भाविकांना मंदिराकडे जाण्याचा रस्ता सुलभ होईल हो पुजारांचे घरही भक्तांना जवळ पडेल . या सर्व बाबींचा सखोल विचार करून माननीय श्री राणा दादांनी योग्य तो जनहितार्थ निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.
वंदे भारत लिव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर






