समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र:
चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ रेल्वे स्थानकावर देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन एमपीटी मशीनची धडक होऊन चार रेल्वे कर्मचारी जखमी झाले. ही घटना पहाटे घडली.
मूळ रेल्वे स्थानकावर एक मशिन आधीच उभी असताना मागून येणाऱ्या एका मशिनला धडक दिली. हा मोठा क्रॅशचा आवाज ऐकून स्थानकावर उपस्थित लोक काही काळ घाबरले. या धडकेत मशिनच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.