A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedमहाराष्ट्र

यामिनी व मानसी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नागपुर विभागाचे करणार प्रतिनिधित्व

 

:-    क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, नागपुर, जिल्हा क्रीडा परिषद, नागपुर व जीत कूने दो असोशिएशन ऑफ नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी नागपुर विभागीय जीत कूने दो क्रीडा स्पर्धेचे आयोजन सेंट झेवियर्स स्कूल येथे करण्यात आला. या स्पर्धेत नागपुर विभागाचे वर्धा, भंडारा, नागपुर, गोंदिया, व चंद्रपूर जिल्हे आले होते. याच स्पर्धेत स्थानिक मुरलीधर बागला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथील कु. यामिनी रवी देवांगन व कु. मानसी गजेंद्रसिंग दरबार यांनी प्रथम क्रमांक पटकावला व समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय जीत कुने दो क्रीडा स्पर्धेत आपली जागा पक्की केली. समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत ही दोन्ही विद्यार्थिनी नागपुर विभागाचे प्रतिनिधित्व करणार. या उत्कृष्ट विजयी कामगिरी साठी बागला चेरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्रजी बागला व मुरलीधर बागला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य श्री. उमेश पंधरे सर यांनी कौतुक केलं. तसेच शारीरिक शिक्षक श्री. मुकेश पाण्डेय (N.I.S. कोच) व सौ. प्रांजली गर्गेलवार यांचा मार्गदर्शन लाभला. हे दोन्ही खेळाडू आता पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमी येथे सराव करत आहे. त्याच प्रमाणे समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बागला हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.

संपादक:- श्री. मुकेश पाण्डेय

चंद्रपूर, महाराष्ट्र

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!