A2Z सभी खबर सभी जिले की

स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचा फोटो व्हायरल, समाज संतापला, उध्या दि ५ मार्च रोजी जामखेड तालुका बंदची हाक

स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचा फोटो व्हायरल, समाज संतापला, उध्या दि ५ मार्च रोजी जामखेड तालुका बंदची हाक

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या क्रूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाजातील संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून जामखेड तालुक्यात दि.५ मार्च २०२५ रोजी बंद पुकारण्यात आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे, ज्यामुळे समाजमन व्यथित झाले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. हत्येचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे. जामखेड तालुक्यात उध्या दि. ५ मार्च २०२५ रोजी बंद पुकारण्यात आले आहे, ज्याच्यामागे आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली जात आहे.

याबाबतचे निवेदन जामखेड पोलीस स्टेशनलाही देण्यात आले आहे. सदर निवेदनावर पांडूरंग भोसले, प्रदिप टाफरे, मंगेश आजबे, धिरज पाटील व आशोक पोटफोडे यांच्या सह्या तर यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!