A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

झरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा

 

राजुरा : यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बंदी वाढोणा येथील शेतात काम करतांना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज गुरुवार ला सकाळी 9 वाजताचे दरम्यान घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

वसंतराव नरसिंग चव्हाण (40) असे वीज पडून ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मृतक शेतकरी हा शेतात काम करीत होता. गत दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल होवून आज सकाळी बंदी वाढोणा परिसरात तुरळक पाऊस झाला. अशातच विजेचा कडकडाट होवून शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळली. यातच चव्हाण हे शेतकरी जागीच गतप्राण झाले. या दुर्देवी घटनेने बंदी वाढोणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक शेतकऱ्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन मुले आहे.

Back to top button
error: Content is protected !!