A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

योग नृत्य परिवार आष्टी येथे वर्धापन दिन साजरा

संजय पारधी चंद्रपुर

चंद्रपुर  : योग नृत्य परिवार मुख्यालय चंद्रपुर चे जनक भाई श्री गोपाल जी मुधंडा जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ घोडके महिला जिल्हा प्रमुख किशोरीताई हिरुडकर उपजिल्हा प्रमुख प्रमोद बाविसकर सांस्कृतिक मंत्री प्रशांत कतुरवार सर आझाद गार्डन चे केंद्र प्रमुख संतोष पिंपळकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व शिबीर प्रमुख अशोक पडगीलवार माजी प्राचार्य खराती सर .शेख मॅडम.जेष्ठ महिला जाधव काकु यांच्या प्रमुख उपस्थितीत योग नृत्य परिवार महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी तह.चामोर्शी जिल्हा गडचिरोली. येथे केंद्राचा 3.रा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 3.वर्ष अगोदर छोटस रोपट लावल पाहता पाहता वटवृक्षा प्रमाने वाढतच गेल .योग नृत्यामुळे मानसिक ताण कमी होतो शारीरिक फिटनेस वाढतो रोग प्रतीकार शक्ती वाढते. त्यामुळे बि पी .शुगर. थायरॉईड. गुढगे दुखी या पासून कोसो दुर राहून शरिर तंदुरुस्त राहते असे भाई श्री गोपाल जी मुधंडा यांनी सांगितले. तसेच योग नृत्य निशुल्क असुन त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे कळकळीचे आवाहन केले.सरिता दुर्गे. वैशाली बाविसकर. छाया हिरोळे यांनी सर्वांना योग नृत्याचे धडे दीले सर्व प्रथम मान्यवरांचे पुष्पा च्या वर्षावात स्वागत करुन भारत मातेच्या फोटोस मालारपण व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली कविता पोलोनी यांनी स्वागत गीत तर बालकलाकार कु. प्राप्ती आलुरवार हिने सुंदर नृत्य सादर करुण वाहवा मिळविली तर प्रेरणा गीत आत्राम सरांनी गयीले प्रास्ताविक प्रा. इंगोले सर यांनी केले. सुंदर सुत्र संचालन नारायण सालुरकर सर तर आभार दुर्गे सरांनी मानले केंद्र प्रमुख रमण पोलोजीवार सर प्रशिक्षक प्रीती आलुरवार दिपक पांडे रजनीताई बावने विलास देहारकर राजुभाऊ बरलावार प्रकाश कुबडे नागुलवार ताई संजिवनी बांडे सपना पांडे सारीका झाडे इत्यादींनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला चहा नाश्ता नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Back to top button
error: Content is protected !!