A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्र

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

अहिल्यानगर, दि. २५ : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेश उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच वसतीगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी वेळापत्रकानुसार अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद लोंढे यांनी केले आहे.

१२ वी नंतर व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर (अबिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.

३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान अर्जांची छाननी केली जाईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राहील.

रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांपैकी गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

*******

Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!