A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

शेतक-यांच्या हक्क- अधिकाराकरिता भारतीय किसान संघ मैदानात जिल्हा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन विलास केजरकर भंडारा.

शेतक-यांच्या हक्क- अधिकाराकरिता भारतीय किसान संघ मैदानात जिल्हा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन विलास केजरकर भंडारा.

प्रेस नोट
भंडारा

शेतक-यांच्या हक्क- अधिकाराकरिता भारतीय किसान संघ मैदानात
जिल्हा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- भारतीय किसान संंघ विदर्भ प्रांत नागपूर व भारतीय किसान संंघ जिल्हा शाखा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून जास्तीत जास्त मोबदला मिळावा तसेच शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्र सुरु करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपरजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनानुसार भंडारा जिल्हयामधील शेतक-यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला असुन मोठ्या प्रमाणात भात पिक, फळबाग व भाजीपाल्याचे नुकसान झालेले आहे. भंडारा जिल्हयात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील धानपीक गर्भात आले असून काही शेतक-यांच्या हलक्या धानाची कापणी झाल्यावर धानाच्या कळपा पावसात सडले आहेत. तर काही उभे आहेत. ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर विविध किटकांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्ती धानाचे उत्पादन कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. अगोदर पावसाने रडवले, आता किडींचा प्रादुर्भावाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. फळे, हिरव्या पालेभाज्या, फुले यांच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याकरीता प्रशासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने आर्थिक मोबदला देण्यात यावा. तसेच जिल्हयातील धान उत्पादक शेतक-यांचे हलके धान कापण्यात आलेला असून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. अवकाळी पावसामुळे नुकासान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १० लाख रु. देण्यात यावे. सन २०२५ -२०२६ या वर्षी खरीप हंगामासाठी हेक्टरी ३०,००० रु. बोनस जाहीर करावा. मागील वर्षी खरीप हंगामातील उरलेल्या शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा. वन्य प्रांण्यापासुन होणारे नुकसानीचे पंचनामे करुन आठ दिवसात मदत देण्यात यावी. कृषी पंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विज जोडणी देण्यात यावे. थकीत व सुरु वर्षातील पिक कर्ज संपुर्ण माफ करावे. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपरजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
याप्रसंगी भारतीय किसान संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे, जिल्हा मंत्री दिनेश कापगते, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, गिरधारी लांजेवार, मंगला कोल्हे, ऋग्वेद येवले, पी. व्ही. मोघे, भिमराव तवाडे, भागवत बडवाईक अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!