प्रेस नोट
लातूर
**प्रभाग ०२ मध्ये ‘शिट्टी’चा रणशिंग फुंकला!
महाराष्ट्र विकास आघाडीचे नौशाद शेख – रेश्मा शेख अधिकृत मैदानात**
(लातूर |नाना शेख)
लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ०२ मधून महाराष्ट्र विकास आघाडीने आपले अधिकृत उमेदवार जाहीर करत निवडणूक रणांगणात थेट आव्हान दिले आहे.
पुरुष खुला (ड) – नौशाद इक्बाल शेख आणि महिला (क) – रेश्मा नौशाद शेख हे दोघेही अधिकृत उमेदवार असून, त्यांना ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.
प्रभाग ०२ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न, दुर्लक्षित नागरी सुविधा आणि अपूर्ण विकासकामे यावर थेट प्रहार करण्याच्या भूमिकेत हे उमेदवार उतरले आहेत.
“फक्त आश्वासने नाही, थेट काम!” हा त्यांचा ठाम संदेश आहे.
२४ तास जनतेसाठी उपलब्ध राहण्याची ग्वाही
नौशाद इक्बाल शेख यांनी यापूर्वीच २४ तास शहरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी उपलब्ध राहण्याचे जाहीर आश्वासन दिले असून, ही भूमिका केवळ प्रचारापुरती न ठेवता प्रत्यक्ष अंमलात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
विकासाचा ठोस अजेंडा
उमेदवारांनी प्रचारात
✔ स्वच्छता
✔ पाणीपुरवठा
✔ रस्ते
✔ स्ट्रीट लाईट
✔ मूलभूत नागरी सुविधा
या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले असून, “फाईलवर नाही तर रस्त्यावर काम दिसले पाहिजे” अशी ठाम भूमिका मांडली आहे.
मतदान दिनांक जाहीर
प्रभाग ०२ मधील मतदारांसाठी मतदान
🗓 गुरुवार, १५ जानेवारी २०२६
⏰ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३०
या वेळेत होणार आहे.
प्रभाग ०२ मधील मतदारांना थेट आवाहन
“बोलघेवडे प्रतिनिधी नकोत, काम करणारे नगरसेवक हवेत.
‘शिट्टी’ चिन्हासमोर बटण दाबा — बदलाची शिट्टी वाजवा!”
प्रभाग ०२ मध्ये यंदा निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित असून, महाराष्ट्र विकास आघाडीने उमेदवारी जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015









