
संजय पारधी चंद्रपूर
श्री महर्षी विद्या मंदिर, दाताळा रोड, चंद्रपूर येथील इयत्ता 6 वी चा विद्यार्थी मयंक संतोष काळे या खेळाडूने व्हॉलीबॉल क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून आपल्या शाळेचे तसेच आपल्या जिल्हयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक केले.
मयंकने 27 डिसेंबर 2025 रोजी चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये आपल्या खेळाची उत्कृष्ठ कामगिरी केल्यामुळे ह्याचे राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी (CBSE – WSO) 14 वर्षा खालील संघात निवड झाली आहे.
हा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा हिमाचल प्रदेश येथील सिरमौर येथे 5 जानेवारी ते 9जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. मयंकच्या या यशामुळे श्री महर्षी विद्या मंदिर शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
ही शाळेकरीता अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे. या यशाकरिता शाळेचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख दिनेश कोयचाडे, रुपेश बोढे, संजय पारधी , रुचिता आंबेकर , पायल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या उज्वल यशाकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी मूर्ती , उपमुख्याध्यापिका निशा मेहता तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक , सचिव दत्तात्रय कंचर्लावर यांच्यासह सर्व सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी खेळाडूंचे अभिनंदन केले.







