A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र
Trending

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.  

दिनांक :- 01/02/2026

—————————–

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.

———————————

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, कुरण ता. संगमनेर ताल्याकातुन तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी वय – 13 वर्षे, हिस आरोपी नामे कलीम अकबर पठाण रा. जमजम कॉलनी संगमनेर याने कशाचे तरी अमिष दाखवुन पळवुन नेले आहे. सदर घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 866/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 37(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेवुन अपहरण करणारे आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले.

सदर आदेशानुसार पोनि श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, महिला पोलीस अंमलदार, ज्योती शिंदे, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेवुन अपहरण झालेल्या मुलींची माहिती काढणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

वरील पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी व पिडीत मुलीचे व्यवसायीक कौशल्याचे आधारे शोध घेत असतांना पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीसह झरेकाटी येथुन देवगाव मार्गे संगमनेर येथे विना नंबरचे बजाज प्लॅटीना मोटार सायकलवर येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने देवगाव रोड सिध्दकला हॉस्पिटल जवळ सापळा लावुन थांबले असता गुन्ह्यातील आरोपी हा गुन्ह्यातील पिडीत मुलीसह मोटार सायकलवर येतांना दिसुन आला. तेव्हा पथकाने शिताफिने ताब्यात घेवुन त्याला त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) कलीम अकबर पठाण वय- 22 वर्षे रा. गल्ली नं.10 जमजम कॉलनी, संगमनेर, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले, तसेच महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने पिडीत मुलगी हिस ताब्यात घेण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपीकडुन 30,000/-रु कि.ची एक बजाज प्लॅटिना मोटार सायकल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी कलीम अकबर पठाण यास त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस करता त्याने सदर मोटार सायकल त्याचा साथीदार जुनेद युनुस शेख रा. समनापुर याचे सोबत झोळे ता.संगमनेर येथुन चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे अभिलेखाची खात्री करता संगमनेर तालुका पो.स्टे एन.सी.आर.नं. 81/2026 भारतीय न्यांय सहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

आरोपी नामे कलीम अकबर पठाण यांचेविरुध्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 109/2019 भादवि कलम 394,34

2 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 112/2021 म.जु.का.क 379

3 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 165/2021 भादवि कलम 392,34

4 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 170/2021 भादवि कलम 399,402

5 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 181/2019 भादवि कलम 380, 457

6 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 183/2018 भादवि कलम 380,457,454

7 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 196/2019 भादवि कलम 380,457

8 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 214/2018 भादवि कलम 380,457

9 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 333/2021 भादवि कलम 392

10 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 337/2022 भादवि कलम 394,392,34

11 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 349/2021 भादवि कलम 379

12 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 361/2022 भादवि कलम 392,34

13 शिर्डी, जि. अहिल्यानगर 425/2022 भादवि कलम 392, 34

14 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 429/2018 भादवि कलम 380,457

15 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 432/2019 भादवि कलम 353,332

16 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 502/2022 भादवि कलम 392, 34

17 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 595/2022 भादवि कलम 379,

18 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 688/2022 भादवि कलम 394, 34

19 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 742/2022 भादवि कलम 392, 34

20 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 860/2024 बी.एन.एस.कलम 310(4),(5)

21 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 916/2023 भादवि कलम 307,224

 

ताब्यातील आरोपी, मुद्देमाल व अल्पवयीन मुलगी यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 866/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्ह्याचे पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी हजर केले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Back to top button
error: Content is protected !!