
छत्रपती संभाजीनगर:
बजाज नगर वडगाव कोल्हाटी; प्रतिनिधी.
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला अवघ्या 1दिवस शिल्लक असताना, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट फिरत आहे. आणि त्या मद्ये काही बातम्यांची प्रिंट आहे… या वरून आता ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळविलेले निलेश सोनवणे यांच्या भावजई जिल्हा परिषदांच्या रिंगणात उतरल्या आहेत…
त्यांचा प्रचाराचा जोर पाहता , अंबादास दानवे यांची झालेली झंजावाताची सभा या वरून.
विरोधकांची पाय खालीची वाळू सरकली आहे…
ललिता सोनवणे यांना रोखण्यासाठी विरोधकांकडून षडयंत्र रचले जात आहे, गरुड झेप नावाची अकॅडमी चे संचालकांचं नाव न घेता त्यांच्या अकॅडमीच्या नावाने बदनामीकारक पोस्ट आता व्हायरल केली जात आहे. त्यांच्या अकॅडमीमध्ये गेल्या वर्षी काही अपप्रिय घटना घडल्या होत्या, या घटने वरून त्यांना व त्यांच्या अकॅडमी ला टार्गेट करण्यात आले.. या सर्व प्रकरणातून हायकोर्टाने ज्यांची निर्दोष मुक्तता केली, या प्रकरणाविषयी सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर अशी माहिती देखील दिली होती.. त्यानंतर सुद्धा त्यांच्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढतच गेली…
परंतु राजकीय दोषापोटी आता हे जुने प्रकरण मतदानावर याचा परिणाम घडून यावा या उद्देशाने अशी पोस्ट फिरत आहे.. याविषयी सोनवणे यांना विचारले असता त्यांनी राजकीय षडयंत्रपोटी माझ्या विरोधा त असा अपप्रचार केला जात आहे असे सांगितले, सोनवणे या सर्व प्रकरणावर कायदेशीर प्रक्रिया करणार आहेत असे सांगितले.





