
‘महाराष्ट्र मे स्मार्टमिटर पर नाराजी,हावितरण बना,पूंजीवादी का मदतगार’
जि.प्रतिनिधी:डां.पंजाबराव खाडे
प्रत्येक स्मार्ट मीटर हा मोबाईल nework मध्ये जोडलेला असतो, यासाठी त्याला नेटवर्क चार्जेस भरावे लागणार आहेत.हे नेटवर्क चार्जेस साधारण 100 रुपयांच्या आगेमागे असतील. महाराष्ट्रातील एकूण वीज दर देशात सर्वात जास्त आहेत.यामुळेच ग्राहक मोठी गुंतवणूक करत सोलर सिस्टीम बसवत आहेत. स्मार्ट मीटर मुळे दिवसा कमी दर राहतानाच अन्य वेळी वाढीव दर किती?
या बद्दल माहिती मिळणे आवश्यक आहे. दुसरे, दिवसा घरगुती वापर कमीतकमी असतो, तर संध्याकाळ नंतर खूपच वाढतो. म्हणजेच वापर नसताना सवलत ?
या पुढील काळात फक्त नेटवर्क चार्जेस, बिल वितरण यासाठीच ग्राहकावर मोठा भार पडणार आहे.याची संपूर्ण विचार करतांना जाणीव ठेवावी लागेल, शहरी,ग्रामिण भागात साधारण 10% घरे बंद असतात,त्यांचेही किमान बिल वाढणार आहे.वितरण ने महीनाभर वापरच नसेल तर व्हॅलिडीटी बद्दल स्पष्ट करावे.
स्मार्ट मीटर हीअँडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. सर्व काही idal असेल तर चालेल, इकडे खेडेगावात दोन दिवस तीन दिवस वीज पुरवठा बंद पडतो!त्या संदर्भात कंपनीने जनतेत स्पष्ट करावे,कंपनी मा.न्यायालयचे निर्णय मानण्यास बाध्य नाही का?कारण 2023 अन्वये 47(5) प्रमाणे जनतेने पोस्टपेड, वापरावे किंवा प्रीपेड हा न्यायालय ने दलेला वयक्तिक हक्क असतांना 48 मिटर लावा अशा आशयाचे मोबाईल संदेश जनतेस सोडने हा सायबर गून्हा नव्हे का?तसेच लवाजमा सोबत घेवून,सूरक्षा गार्ड सह ग्राहकांवर दबाव वाढवणे,
ग्राहक घरी नसतांना मिटर बदलणे,हे मा.न्यालयाचे निर्णयाचे हणन नाही का.?
तेव्हा जनतेचा प्रचंड विरोध व जनमत नाकारणे,पुंजीवादी करीता कंपनीने लाचारी स्विकारणे कितपत योग्य असु शकते.?असा नाराजीचा स्वर जनतेत उठत आहे.











