
संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्र
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्हास्तरीय आंतरशालेय ट्रेडिशन लाठी स्पोर्टस स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध शाळेतील विद्यार्थयांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये या शाळेतील एकुण 51 मुलांनी सहभाग घेतला होता. त्यामधुन 30 मुलांचे ट्रेडिशन लाठी स्पर्धा पुददुचेरी (तामिलनाडु) येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाल्याने शाळेचे संस्थापक अविनाश खेरे संचालिका निना खैरे यांनी विधार्थ्यांचा सत्कार केला आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मेनका भंडूला यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक मनोज के सर व प्रमोद वासेकर सर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याचे सागितले






