A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

अल्प दरात सिमेंट देण्याच्या नावावर ग्राहकांचे करोडो रुपये घेऊन दुकानदार पळाला.

अल्प दरात सिमेंट देण्याच्या नावावर ग्राहकांचे करोडो रुपये घेऊन दुकानदार पळाला.

प्रेस नोट
प्रतिनिधि नागपूर शहर

अल्प दरात सिमेंट देण्याच्या नावावर ग्राहकांचे करोडो रुपये घेऊन दुकानदार पळाला
नागपूर:- स्वस्त प्रमाणात कंपनीद्वारे सिमेंट मिळवून देतो असे ग्राहकांना आमिष देऊन ग्राहकांना सी. पी.ट्रेडर्स प्लॉट .नं. ०२,श्रीनगर बहादुरा फाटा ,नगर पंचायत पाण्याच्या टाकी जवळ येथे सी. पी.यादव यांचे सी. पी. ट्रेडर्स या नावाने दुकान होते ते ग्राहकांना स्वस्त दरा मध्ये सिमेंट मिळवून देतो आणि माझी अंबुजा सिमेंट कंपनीचे संचालक श्री.हर्षल हे माझ्या ओळखीचे आहे. तसेच अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे सप्लायर श्री. बॅनर्जी हे सुध्धा माझ्या एकदम जवळचे आहे. त्यामुळे तुम्हाला मार्केट रेट पेक्षा ५०-६० रुपयांनी स्वस्त देतो असे तो ग्राहकांना सांगायचा आणि ग्राहकांचे सुध्धा ५०-६० रुपये कमी होतात त्यामुळे साहजिकच ग्राहक त्याचेकडे जात होते. आणि ग्राहकांना जास्त प्रलोभन देऊन आपल्या तावडीमध्ये अडकवित होता. आणि पूर्ण पैसे पहिलेच घेत होता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळे दराने सिमेंट द्याचा त्यामधे कमीत कमी ८०-१०० ग्राहक आहेत. सर्व ग्राहकांच्या अंदाजानुसार जवळपास २.५ ते ३.५ करोड रुपये जमा करून सी. पी. ट्रेडर्सचा मालक श्री.चंद्रप्रकाश रामस्वरूप यादव वय अंदाजित ४५ वर्ष असे आहे. दि.१९/११/२०२४ ला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो दुकान बंद करून पळून गेला. असे माहिती झाले की दि.२१/११/२०२४ ला काही ग्राहकांना सिमेंटची आवश्यकता असल्याने त्यांनी त्याला वारंवार फोन केले परंतु त्याचा फोन बंद येत होता .तेव्हा काही ग्राहक त्याच्या दुकानामध्ये गेले होते तेव्हा त्याचे दुकान बंद होते. त्यांनी दुकानाच्या आजूबाजूला चौकशी केली असता सदर आरोपी हा आपले दुकान बंद करून पळून गेल्याचे कळले. तेव्हा ग्राहकांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. काही ग्राहकांनी सायंकाळी सक्कदरा पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले असता तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी फसवणुक झालेल्या ग्राहकांना लेखी तक्रार देण्यास सांगितले त्यानूसार ग्राहकांनी लेखी तक्रार दिली.
त्यानंतर दि.०६/१२/२०२४ ला अभय रमेश पुणेकर आणि इतर ग्राहकांच्या तक्रारीवरून सी. पी.यादव उर्फ चंद्रप्रकाश राम स्वरूप यादव वय अंदाजित ४५ वर्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आतापर्यंत २०-२५ ग्राहक समोर आलेले आहे. आणखी फसवणुक झालेल्या ग्राहकांनी श्री. अभय पुणेकर मो. नं.९८५०२४१५०३ आणि शेषराव थोटे मो. नं.८४२१०८२४५४ यांचा सोबत संपर्क साधावा. तसेच पोलिस स्टेशन सक्कदरा येथे जाऊन तक्रार करावी अशी यांनी याद्वारे विनंती केलेली आहे.

वंदे भारत लाइव टीवी न्यूज नागपुर
एडिटर
दिल्ली क्राईम प्रेस, नागपुर
एड. एसोसिएट
प्लॉट नं.18/19, फ्लैट नं.201, हार्मनी एम्पोराईज पायल पल्लवी सोसायटी न्यू मनीष नगर सोमलवाडा नागपूर -440015, सम्पर्क नं:- ९४२२४२८११०/९१४६०९५५३६

Back to top button
error: Content is protected !!