A2Z सभी खबर सभी जिले की

चंद्रपूर च्या कॉन्व्हेंट शाळेतील अवैध प्रकार ; शिक्षकांच्या मौलिक अधिकाराचे हनन

समीर वानखेडे ब्युरो चीफ:
चंद्रपूर शहरातील नागपूर रोडवरील एका मान्यताप्राप्त कॉन्व्हेंट शाळेत संस्थाचालक शिक्षकाकडून न्यायालयीन प्रक्रिया द्वारे कायद्याच उल्लंघन करणारा करारनामा लिहून घेत आहे, जे की तेथील शिक्षकांच्या मौलिक अधिकाराचे हनन आहे.
जी शिक्षण संस्था रोज शाळेत विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ घ्यायला लावते, शासनाला MEPS1977 व नियमावली 81 नुसार शाळा चालवण्याचे शपथ पत्र लिहून देते तीच संस्था शिक्षकावर दबाव तंत्राचा वापर करून ,आपण शासनाला लिहून दिलेल्या शपथपत्राच्या विरुद्ध कृती करीत आहे.
शिक्षकांकडून दबाव तंत्राचा वापर करून समझोता न्यायालयात एक बेकायदेशीर ड्रॉप तयार करून शिक्षकांना त्या ड्रॉप वर सही करण्यासाठी दबाव तंत्राचा उपयोग करून त्यांच्याकडून ते करून घेत आहे.
असे न केल्यास त्या शिक्षकांना शाळेतून काढून देण्याची धमकी देत आहे.
ही फार निंदनीय बाब असून शालेय व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे.
शिक्षण संस्थाचालक आपल्या स्वार्थासाठी देशाच्या संविधानाचा व शालेय नियमाचा अपमान करीत असून समाज घडविणाऱ्या शिक्षकांना अपमानित करीत आहे.
माननीय प्रशासकीय व्यवस्थेने या अनैतिक कार्याची गंभीर दखल घेऊन अशा शिक्षण संस्था चालकांच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कॉन्व्हेंट विभागाचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी प्रशासनाला केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!