A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

गॅस सिलिंडर वेळेत द्या, ग्राहकांच्या समस्या त्वरित सोडवा – जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे

गॅस सिलिंडर वेळेत द्या, ग्राहकांच्या समस्या त्वरित सोडवा – जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे

 

गॅस सिलिंडर नोंदणी आणि वितरणाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. वितरकांनी या समस्या प्राधान्याने सोडवून ग्राहकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून द्यावे. तसेच, गॅस वितरणाबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी १९०६ या राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

 

श्रीमती बढे यांनी सांगितले, प्रत्येक गॅस वितरण केंद्रावर तक्रार क्रमांक ठळकपणे लावण्यात यावा व वितरकांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे. यासोबतच, नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळेल आणि त्यांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी विद्युत विभागाला दिल्या.

 

महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, शहरात वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्किंगचे नियोजन करावे, भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा आणि अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र करावी, असे महत्त्वपूर्ण निर्देशही श्रीमती बढे यांनी यावेळी दिले.

 

या बैठकीत केवळ शहरच नव्हे, तर ग्रामीण भागातील प्रश्नांवरही चर्चा झाली. खतांची सक्तीने लिंकिंग करणारे विक्रेते आणि दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विविध शासकीय विभागांमध्ये येणारे तक्रार अर्ज तातडीने स्वीकारण्यावर भर देण्यात आला.

 

या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त मेहेर लहारे, सहाय्यक पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच, अशासकीय सदस्य विलास जगदाळे, प्रा. अमिता प्रीतमसिंग रानू-कोहली, अशोक शेवाळे, डॉ. राजेंद्र पर्वती कळमकर, डॉ. विलास सोनवणे व प्रकाश रासकर यांनी या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

 

#Ahilyanagar #ConsumerAwareness #LPGUpdate #GasCylinder #DistrictCollector #CitizenSafety #अहिल्यानगर #ग्राहक_पंचायत #जिल्हा_प्रशासन #गॅस_तक्रार #हेल्पलाईन१९०६ #नागरी_सुविधा #स्वच्छता #अतिक्रमण_मुक्त_शहर

Back to top button
error: Content is protected !!