A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

◆ *अपहरणकर्ता अर्शद चौधरी वसईतील बेकायदा बांधकामांचा बेताज बादशाह?* ◆ उमर कंपाऊंड अपहरणकर्त्यांचा मुख्य अड्डा ◆ वसई-विरार महानगरपालिकेचा भुमाफियांना अलिखित पाठींबा ◆ शहजाद खान, इर्शाद खान, हमीद शेख व रफीक पठाण कडून बेकायदा बांधकामांचा हैदोस?

◆ *अपहरणकर्ता अर्शद चौधरी वसईतील बेकायदा बांधकामांचा बेताज बादशाह?* ◆ उमर कंपाऊंड अपहरणकर्त्यांचा मुख्य अड्डा ◆ वसई-विरार महानगरपालिकेचा भुमाफियांना अलिखित पाठींबा ◆ शहजाद खान, इर्शाद खान, हमीद शेख व रफीक पठाण कडून बेकायदा बांधकामांचा हैदोस?

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि

◆ *अपहरणकर्ता अर्शद चौधरी वसईतील बेकायदा बांधकामांचा बेताज बादशाह?*
◆ उमर कंपाऊंड अपहरणकर्त्यांचा मुख्य अड्डा
◆ वसई-विरार महानगरपालिकेचा भुमाफियांना अलिखित पाठींबा
◆ शहजाद खान, इर्शाद खान, हमीद शेख व रफीक पठाण कडून बेकायदा बांधकामांचा हैदोस?
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
वसई-विरारमधील वसई-विरार महापालिकाक्षेत्रातील पेल्हार प्र्रभाग 2 जुलै रोजी भुमाफियांकडून दै. मुंबई मित्र‌’साठी वितरणाचे काम करणाऱ्या अभिषेक तिवारीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. याबाबतीत 6 दिवसांनंतर संपुर्ण तपासाअंती पेल्हार पोलीस ठाण्यात 10 जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम 127 (2), 129, 135,, 138, 115 (2), 118 (1), 351 (2), 352, 140 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील मुख्य अपहरणकर्ता अर्शद चौधरीची गुन्हेगारी पार्श्वभुमी उघडकीस आली आहे. अर्शद चौधरीवर यापुर्वी वालीव पोलीस ठाण्यात कलम 326, 323,506,34 अशा गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. परंतू याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त वसई-विरार शहर महानगर पालिका आहे. कारण यासंपुर्ण घटना भुमाफियांच्या बेकायदा बांधकामाना वाचवण्यासाठी केल्या जात आहेत. पालिका अधिकाऱ्यांकडून बेकायदा बांधकामांना पुर्णपणे संरक्षण दिले जात असल्याने भुमाफियांकडे गडगंज पैसा आला असून याची चौकशी केल्यास यामध्ये ‌‘ईडी‌’ला हस्तक्षेप करावा लागले कारण हा आकडा करोडो रुपयांत आहे. त्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकाच भुमाफिया तयार करते किंबहुना त्यांच्या बेकायदा बांधकामांना अलिखित पाठींबा देऊन त्यांना मोठे करते असे बोलले जात आहे. अर्शद चौधरीकडून पेल्हार व वालिव प्रभागात बेसुमार अनधिकृत बांधकामे केली जात असून यामध्ये सर्वसामान्यांसह वित्तीय संस्थांचीही आर्थिक फसवणूक होत आहे. ‌‘दै. मुंबई मित्र‌’ आज ‌‘एक्सपोज‌’ सदरच्या माध्यमातून अर्शद चौधरी, शहजाद खान, इर्शाद खान, हमीद शेख व रफीक पठाण यांचा वसईत असलेल्या बांधकामाचा लेखा जोखा मांडत आहे.
अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण
मिळवण्यासोबतच ही बांधकामे पुन्हा उभी राहू नयेत म्हणून कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी उपायुक्त व सर्व प्रभागांचे सहाय्यक आयुक्त आणि त्या-त्या विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांवर आहे, परंतु अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळवण्यात पेल्हार व वालीव विभाग सपशेल अपयशी ठरले आहेत.
‌‘दै. मुंबई मित्र‌’चे स्थानिक पत्रकार बि.के पांडे यांनी अपहरणकर्ता अर्शष चौधरी व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामांबाबतीत पालिका प्र्रशासनाशी मोठ्याप्र्रमाणात पत्र व्यव्हार केला आहे, परंतू कोणतीही कारवाई झालेली नाही. याची मोठी उदाहरणे म्हणजे अनेक पत्रे, दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी पालिका अति. आयुक्त रमेश मनाले यांना प्रभाग समिती ‌‘सी‌’मध्ये अवधूत आश्रमच्यामागे अर्षद चौधरीकडून 20 हजार स्क्वेअर फुटांचे सुरु बांधकाम केले होते त्यानंतर 8 महिने होऊन ही कारवाई झाली नव्हती त्यानंतर 23 जुलै 2024 रोजी पुन्हा पत्र दिले परंतू कारवाई करण्यात आली नाही.
दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना प्रभाग समिती ‌‘एफ‌’मधील रिचर्ड कंपाऊंड, उमर कंपाऊंड, मायकल कंपाऊड, जाबर पाडा, येथे अर्शद चौधरी व शहजाद कडून तब्बल 2 लाख स्क्वेअर फुटांची बांधकामे केली असून त्याची छाया चित्रांसहित तक्रार अर्ज दिले आहेत. त्यानंतर 24 जुलै 2024 रोजी पुन्हा उपायुक्त दिपक झिंजाड यांना स्मरण पत्र दिले असून अद्याप कारवाई झालेली नाही.
दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी पालिका अति. आयुक्त रमेश मनाले यांना प्रभाग समिती ‌‘एफ‌’मध्ये अर्षद चौधरी व शहजाद खानकडून उमर कंपाऊंड, जाबर पाडा, रिचर्ड कंपाऊंड, धानीव बान येथे तब्बल 5 लाख स्क्वेअर फुटांचे सुरु बांधकाम केले होते त्यानंतर 8 महिने होऊन ही कारवाई झाली नव्हती त्यानंतर 24 जुलै 2024 रोजी पुन्हा पत्र दिले परंतू अद्याप कारवाई करण्यात आली नाही.
दि. 12 जून 2023 रोजी पालिका सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना प्रभाग समिती ‌‘एफ‌’मध्ये उमर कंपाऊंड येथे अर्षद चौधरीकडून 25 हजार स्क्वेअर फुटांचे सुरु बांधकाम केले होते त्यानंतर 24 जुलै 2024 रोजी पुन्हा पत्र दिले परंतू पालिकेला कारवाईला मुहुर्त मिळालेला नाही.
याशिवाय इर्शाद खान, हमीद शेख व रफीक पठाण यांच्या लाखों स्क्वेअर फुटांच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्या आहेत. ज्यामध्ये 24 जुलै 2024 रोजी प्रभाग समिती ‌‘एफ‌’ अंतर्गत सागर इस्टेट, सर्वे क्र.275/276, 3, पेल्हार गाव येथे इर्शाद खान कडून 1 लाख 10 हजार स्केवअर फुटांचे बेकायदा आरसीसी पध्दतीचे बांधकामाबाबत व अवधुत आश्रमाच्या मागे, जाबर पाडा येथे ही अंदाजे तब्बल 1 लाख 10 हजार स्क्वेअर फुटांचे आरसीसी पध्दतीचे बांधकाम केले असून उपायुक्त दिपक झिंजाड यांना पत्र देण्यात आले आहे.
त्याचदिवशी रफीक पठाण कडून रिचर्ड कंपाऊंड येथे तयार केलेल्या 1 लाख 40 हजार स्क्वेअर फुटांचे बेकायदा आरसीसी पध्दतीचे बांधकामाबाबत उपायुक्त दिपक झिंजाड यांना पत्र देण्यात आले आहे.
24 जुलै 2024 रोजी प्रभाग समिती ‌‘एफ‌’ अंतर्गत सागर इस्टेट मागे, विरार फाटा, काठीयावाड हॉटेलच्या मागे, रिचर्ड कंपाऊंड, जाबर पाडा व येथे अर्शद चौधरी कडून 1 लाख 25 हजार स्केवअर फुटांचे अनधिकृत बांधकामाबाबत व इर्शाद खान 1 लाख 10 हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम केले असून उपायुक्त दिपक झिंजाड यांना पत्र देण्यात आले असून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

Back to top button
error: Content is protected !!