A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप -बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मल्टीपरपज सोसायटीचा उपक्रम

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप -बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मल्टीपरपज सोसायटीचा उपक्रम

प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
-बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मल्टीपरपज सोसायटीचा उपक्रम

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मल्टीपरपज सोसायटी नागपुर तर्फे युगांतर महीला विद्यालय, टेका नाका,कामठी रोड,नागपुर येथे पांचवी ते दहावीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी नोटबुक ,रजिस्टर वाटप करण्याचा तसेच शाळेमधील दहावी पास झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्याचा कार्यक्रम शनिवारी सकाळीं दहा वाजता आयोजीत करण्यात आला.यामध्ये संस्थेचे अध्यक्ष आयु. सतीश ओरके,कोशाध्यक्ष आयु. कुलदीप फुलझेले, संस्थापक कार्यकारणी तीन सदस्य आयु. रामचंद्र गेडाम, अभिनव फुलझेले व अभय शेवाळे, उपाध्यक्ष आयु. अमृतराज पाटील, महात्मा फुले विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका पाटील ताई व बोधिसत्व सोसायटी चे मॅनेजर प्रतिभा मेश्राम ताई, शाळेच्या मुख्यध्यापिका गंधे व ईतर शिक्षक व शिक्षिका तसेच शाळेचे विध्यार्थी, विद्यार्थिनी हजर होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनीनी स्वागत गीत सादर केले, नंतर कुलदीप फुलझेले, गेडाम साहेब, गंधे मॅडम यांची भाषने झालीत.
त्यानंतर सतीश ओरके यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सर्व विद्यार्थ्याना प्रबोधन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचारावर प्रकाश टाकला. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर ही संस्था काम करत असुन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कधीही आर्थिक मदत लागल्यास सीताबर्डी ऑफिस मध्ये येवुन अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर दहावी पास झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे तसेच रजिस्टर, मार्कशिट ठेवण्यासाठी फोल्डर वाटप करण्यात आले. तसेच कुलदीप फुलझेले साहेब यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ तीन विद्यार्थ्याना रोख बक्षीस दिले त्यानंतर पांचवी ते दहावी चे ८० विद्यार्थ्याना नोटबुक व रजिस्टर वाटप करण्यात आले. शाळेतर्फे शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपला.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्षपद देवाशिष टोकेकर

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!