
अहमदनगर (प्रतिनिधी ) : आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथील प डॉ वि विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची ७५ वी अधि मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा महसूल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी डॉ सुजय दादा विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे, प्रवरा भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्षा गीता थेटे, बँकेचे उपाध्यक्ष मच्छिन्द्र थेटे,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश ससाणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आन्नासाहेब कडू,शांतीनाथ आहेर,ट्रक सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील जाधव, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्या सह सर्व संचालक ,अधिकारी ,सभासद व कामगार उपस्थित होते
