समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
थोरामोठयांची परंपरा लाभलेल्या बहुसंपन्न महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात हलवून राज्यातील युवकांना बेरोजगार केले असून महाराष्ट्राचा स्वाभीमान महायुती शासनाने गुजरात चरणी गहाण ठेवला आहे. दहा वर्षाच्या कार्यकाळात राज्याचे वाटोळे करणा-या भाजपाला धडा शिकविण्याची ही सुवर्ण संधी गमावू नका. असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
स्थानिक रामलिला भवनाचे प्रांगणात पार पडलेल्या काॅंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणुक प्रचारार्थ जाहीर सभेत विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी बहुजन समता पर्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. संजय घाटे, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अँड. राम मेश्राम, सामाजीक कार्यकर्ते चंदुपाटील मारकवार, रिपाईचे पाठींबा जाहीर केलेले उमेदवार अरूण कांबळे, मूलचे माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमीत समर्थ, शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, शहर प्रमुख बादल करपे, बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा निता गेडाम, शहर अध्यक्ष अर्चना चावरे, काॅंग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडपवार आदि उपस्थित होते.
ज्या संविधानावर देशाचा कारभार चालते ते संविधान बदलवु पाहणारी भाजपाने जनकल्याणाच्या नांवाखाली विविध योजना सुरू केल्या असून महागाई वाढवून दुस-या मार्गाने जनतेची पिळवणुक करीत आहे, अशी टिका करतांना वडेट्टीवार यांनी ईडी-सिबीआय ची भिती दाखवून घरफोडत असून फडणवीस-मुनगंटीवार-बावनकुळे घरफोडयांना मदत करण्याचे कारस्थान करीत असल्याचा आरोप केला. सामाजीक कार्यकर्ते चंदुपाटील मारकवार यांनी काॅंग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत सदगृहस्थ असून मतदार संघातील रहीवाशी आहेत. त्यांचा स्वभाव आणि कार्यप्रणाली आवडल्याने पक्षाचा कार्यकर्ता नसतांना त्यांच्या विजयाकरीता परिश्रम घेत असल्याचे सांगून संतोष रावत यांचे कडून जनतेचे काम करून घेण्याची जबाबदारी स्विकारतो. असे आश्वासन दिले. उमेदवार संतोषसिंह रावत यांनी जनतेचे कल्याण आणि क्षेत्राच्या विकासासंबंधी आवश्यक असलेले सर्व गुण आणि अभ्यास आपल्याला असून राजकिय कारकिर्दीत आपल्या कडून कोणतेही अनुचीत प्रकार घडले नसल्याची ग्वाही देतांना निवडून देण्याची विनंती केली. यावेळी चांदापूर येथील माजी सरपंच अशोक मार्गनवार, आदिवासी समाजाचे कार्यकर्ते संपत कन्नाके, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रूमदेव गोहणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, निवृत्त प्राचार्य बंडु गुरनूले, तेली समाजाचे कार्यकर्ते गंगाधर कुनघाडकर, काॅंग्रेसच्या ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुरू चौधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना भाजपा आणि उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा खरपुस समाचार घेतला. सभेचे संचलन शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी आभार तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी मानले. सभेला आबाल स्ञी पुरूष मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
*सभेदरम्यान तालुक्यातील पिपरी दिक्षीत येथील भाजपाच्या 35 युवक कार्यकत्र्यांनी माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व युवक कार्यकत्र्यांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काॅग्रेसचा दुपट्टा टाकून स्वागत केले