संजय पारधी चंद्रपूर, महाराष्ट्रा
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे सांस्कृतिक व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त माध्यमातून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, प्रा. दिवाकर पवार, यांची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले, संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर प्रा. दिवाकर मोहितकर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ” बाबासाहेबांनी घटना तयार करतांना 2500 वर्षांपूर्वी उदयास आलेल्या बौद्ध धर्मातून समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता ही तत्व स्वीकारली तसेच बाबासाहेबाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेली घटना ही भारतीय साठी अमूल्य देणगी होय असे मत व्यक्त केले. ” या कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिवाकर मोहितकर तर आभार प्रकाश मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. पंकज कावरे, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. रोशन साखरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. जयेश गजरे, प्रा. मोहनीश माकोडे, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती