A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ” महात्मा फुलेना ” अभिवादन

संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्रा

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रम महाविद्यालयाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात घेण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रकाश मेश्राम यांची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. बादलशाह चव्हाण सर म्हणालेत की, ” महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने 19 व्या शतकातील शिक्षणतज्ञ होते. ज्यांनी स्त्री शिक्षणाची महुर्तमेढ रोवण्याचे कार्य करतांना सावित्रीबाई ना शिक्षण देऊन पुण्यात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली या सोबतच शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व पटवून दिले ” या कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर चौरे तर आभार प्रदर्शन प्रा दिवाकर मोहितकर यांनी केले.

Back to top button
error: Content is protected !!