
तळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात येरोळ शाळेसह केंद्रातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.
या प्रसंगी येरोळ शाळेतील प्राथमिक विभागातून विद्यार्थीनी नम्रता वणकुद्रे आणि सोनाक्षी तांबोळकर यांनी कारखाने यातून निघणाऱ्या दूषित पाण्याचा शुध्दीकरण व त्याचा वापर हा प्रयोग नमुना निशा जावरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात तयार केला आणि तो प्रथम आला.
तसेच माध्यमिक विभागातून विद्यार्थी रुद्रा गायकवाड,सुमित बनसोडे आणि कृष्णा वाघमारे या विद्यार्थ्यांनी युद्धात वापरला जाणारा रणगाडा,हायड्रॉलिक जेसीबी ,आणि महत्वाचे अंध व्यक्तींना मदत होईल त्यांना चालताना काही अडचण येऊ नये पुढे काही अडचण आली तर ती त्यांना साऊंड मार्फत कळावी,यासाठी सेन्सर गॉगल माणिक चौसष्टे सर यांचा मार्गदर्शन घेऊन तयार केला.आणि हा पण प्रथम आला.
या बद्दल सहभागी विद्यार्थी यांचे मुख्याध्यापक श्री नीचळे सर व शिक्षक आणि सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले