
संजय पारधी चंद्रपुर,महाराष्ट्र
चंद्रपुर : योगनृत्य परिवार मुख्यालय चंद्रपुर पोलीस फुटबाल ग्राउंड तर्फे युगप्रवर्तक बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांना महापरिणीर्वान दिना निमित्य श्रद्धांजली देऊन मानवंदना देण्यात आली योगनृत्याचे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा जिल्हा प्रभारी सुरेशभाऊ घोडके जिल्हा महिला प्रभारी किशोरीताई हिरुडकर यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम घेण्यात आला सर्व प्रथम डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस केंद्र प्रमुख निशा राजपूत राधा देवगिरकर निता नागतुरे अर्चना टेवरे यांनी मालर्पण करून दीप पेटवून कार्यक्रमाची सुरुवात केली अशोक पडगेलवार यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगाची आठवण करून त्यांनी ओबीसी एस टी एस टी या दलित समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष यावर प्रकाश टाकला शिका संघटित व्हा आणी संघर्ष करा असा संदेश दिला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून शिक्षणाला महत्व द्या युगपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्य त्यांचे विचार घरोघरी पोहचवा सर्वात मोठया लोकशाही प्रधान देशाला स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता त्यांना मिळवून देणारे अधिकार रुपी भारतीय संविधान दिले असे मार्गदर्शन करताना सांगितले आझाद गार्डन केंद्रानी बाबासाहेबांच्या पुतळ्या पर्यंत रॅली काढून आदरांजली अर्पण करण्यात आली नागिणाबाग शक्तीनगर डब्लू सी एल . दुर्गापूर केंद्र येथेही कार्यक्रम घेण्यात आला विठ्ठल देशमुख अरुण जुनघरे अविनाश मडावी दिवाकर लांडगे व सर्व उपस्तितानि प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.